Full Width(True/False)

OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये Windows ११ इंस्टॉल करणे शक्य, पाहा कसे

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वीच नवीन Windows ११ ला सादर केले आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम कॉम्प्यूटरसाठी लाँच करण्यात आली आहे. मात्र, डेव्हलपर्सच्या एका ग्रुपने ला थेट अँड्राइड फोनमध्ये इंस्टॉल केले आहे. वाचा : डेव्हलपर्सने विंडोज ११ ला 6T स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केले आहे. हा फोन २०१८ मध्ये लाँच झाला होता. विंडोज ११ चा फर्स्ट प्रीव्ह्यू Windows Insiders साठी उपलब्ध आहे. विंडोज ११ ऑपरेटिंग सिस्टमचे दोन बिल्ड आहे. याचे बिल्ड एक्स६४ आणि ARM६४ साठी आहे. विंडोज ११ चे ARM६४ क्वालकॉम प्रोसेसरला सपोर्ट करते. मात्र, डेव्हलपर्स अनसपोर्टेडेड डिव्हाइसवर देखील इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा व्हिडीओ edi१९४ यूट्यूब चॅनेलवर टाकण्यात आला आहे. याबाबत शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, OnePlus 6T फोन कशाप्रकारे Windows ११ वर बूट करत आहे. यात आधीच ARM साठी विंडोज १० इंस्टॉल होते. रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, Qualcomm Snapdragon ८४५ प्रोसेसरवर चालणाऱ्या फोनमध्ये विंडोज ११ इंस्टॉल करता येऊ शकते. वाचा : स्मार्टफोनमध्ये विंडोज ११ इंस्टॉल केल्यानंतर काही कोर फंक्शन वापरता येत नाही. ब्लूटूथ, स्पीकर आणि वाय-फायचा वापर करू शकत नाही. टच स्क्रीन सपोर्ट मात्र मिळेल. USB एक्सेसरीजचा सपोर्ट देखील फोनमध्ये मिळेल व अँड्राइड अॅप वापरू शकता. पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट विंडोजवर अँड्राइड अॅपचे अधिकृत सपोर्ट देत आहे. मात्र, फोनवर विंडोज वापरण्याचा अनुभव खास नसेल. विना गुगल प्ले स्टोर आणि गुगल सर्व्हिस वापरण्यासारखेच ते आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hzubf4