Full Width(True/False)

जिओच्या ‘या’ प्लानमध्ये मिळेल दररोज ३ जीबी डेटा आणि १ वर्षाची वैधता, पाहा किंमत

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वीच आपला ३,४९९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला होता. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा : ३४९९ रुपयांचा जिओचा नवीन प्लान कंपनीच्या प्रीपेड लाइनअपमधील सर्वात महागडा प्लान आहे. कंपनी या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देत आहे. सोबतच, यामध्ये दररोज ३ जीबी डेटा देखील ऑफर केला जात आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. म्हणजेच, ३,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण १,०९५ जीबी डेटा ग्राहकांना दिला जात आहे. एक दिवसाचा ३ जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर ६४ Kbps स्पीडने नेट वापरता येईल. डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्ससह जिओच्या ग्राहकांना यामध्ये दररोज १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. यात टीव्ही, जिओ सिनेमा सारख्या जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल. दुसरीकडे, एअरटेलचा सर्वात महागडा प्लान २,६९८ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सबस्क्रिप्शन, ३० दिवस अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन मिळेल. व्हीआयकडे २,५९५ रुपयांचा प्लान आहे. हा प्लान ३६५ दिवस वैधतेसह येतो. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, Dinsey+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि विकेंड डेटा रोलआव्हरची सुविधा मिळेल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36b6XqI