नवी दिल्ली. तुमच्या आवडत्या मध्ये लवकरच एक नवीन फीचर जोडले जाणार आहे. या अपडेटच्या मदतीने आता कोणत्याही मिस झालेलया ग्रुप ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलमध्ये हवे तेव्हा रिजॉईन करता येईल. व्हॉट्सअॅपने सोमवारपासून नवीन ग्रुप कॉल वैशिष्ट्य रोलआउट करण्यास सुरवात केली असून हे फीचर लवकरच आपल्या डिव्हाइसवर देखील येईल. वाचा: तुमचा व्हॉट्सअॅप ग्रुपचा कोणताही व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल मिस झाला असेल तर तुम्ही त्यात स्वत: त्यात सामील होऊ शकत नाही. कॉलमध्ये सामील असलेल्या युअर्सनाच नवीन सभासद जोडण्याची सुविधा मिळते. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की नवीन फीचर सुरू झाल्यावर ग्रुप कॉल येताच यामध्ये सामील व्हावे लागणाऱ्या युजर्सवर कोणताही दबाव येणार नाही. WhatsApp वर मिस ग्रुप कॉलमध्ये कसे सामील व्हावे व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉल मिस झाल्यास आता तुम्हाला नवीन पर्याय मिळणार आहे. जर तो ग्रुप कॉल अजूनही सुरू असेल तर व्हॉट्सअॅपच्या कॉल लॉगमध्ये तुम्हाला टॅप टू जॉइनचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक करून, आपण ग्रुप कॉलशी कनेक्ट व्हाल. व्हॉट्सअॅपने एक नवीन कॉल माहिती स्क्रीन देखील तयार केली आहे जी युजर्सना इन्व्हाईट असून देखील कोणत्या युजर्सने कॉल जॉईन केला नाही त्याबद्धल माहिती देईल. जेव्हा ग्रुप कॉल येईल , तेव्हा तुम्हाला Ignore आणि Join चे दोन पर्याय देखील दिसतील. फोन बंद असतानाही चॅटिंग व्हॉट्सअॅपवर आणखी एक नवीन वैशिष्ट्य येत आहे, ज्याद्वारे फोन बंद असतांना देखील चॅटिंग करता येईल. हे वैशिष्ट्य मल्टी-डिव्हाइस समर्थन वैशिष्ट्याखाली उपलब्ध असेल. आपण वेब किंवा डेस्कटॉप आवृत्तीमध्ये व्हॉट्सअॅप वापरत असाल तर आपल्याला फोनमध्ये इंटरनेट सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. नवीन वैशिष्ट्याद्वारे, फोन इंटरनेटशी कनेक्ट नसतानाही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅटिंगचा आनंद युजर्सना घेता येईल. कंपनी सध्या हे वैशिष्ट्य बीटा आवृत्तीमध्ये आणत आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eB9SNK