नवी दिल्ली : वरील हे एन्क्रिप्टेड असले तरीही क्लाउड बॅकअपच्या माध्यमातून लीक होत असल्याचे समोर आले आहे. चॅट्स एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतात, मात्र बॅकअप नाही. अनेक प्रकरणांमध्ये चॅट्स बॅकअपमधून लीक होऊन समोर आले आहेत. वाचा: हे चॅट्स लीक होऊ नये यासाठी WhatsApp गेल्या अनेक दिवसांपासून बॅकअपसाठी देखील एंड टू एंड एन्क्रिप्शन आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने याचे टेस्टिंग सुरू केल्याचे रिपोर्टमध्ये समोर आले आहे. या अंतर्गत आणि आयक्लाउडवर बॅकअप करण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट्स एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतील. एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे सेंडर आणि रिसिव्हर व्यतिरिक्त चॅट्स कोणीही वाचू शकत नाही. कंपनीला देखील यूजर्सच्या चॅटचा अॅक्सेस नसतो. रिपोर्टनुसार, कंपनी WhatsApp beta २.२१.१५.५ मध्ये या फीचरचे टेस्टिंग करत आहे. हे वापरण्यासाठी यूजर्सला पासवर्डची आवश्यकता असेल. वाचा: बॅकअप रिस्टोर करण्यासाठी पासवर्डची गरज लागेल. हा पासवर्ड केवळ यूजर्सला माहिती असेल व याबाबत व्हॉट्सअॅप, फेसबुक, गुगल अथवा अॅपलला माहिती नसेल. या फीचर अंतर्गत पासवर्ड ठेवायचा नसेल तर यूजर्स ६४ डिजिटचे एन्क्रिप्शन देखील वापरू शकता. मात्र, एन्क्रिप्टेड बॅकअप की विसरल्यास त्याशिवाय कधीही बॅकअप रिस्टोर करता येणार नाही. दरम्यान, तुम्ही व्हॉट्सअॅपचे बॅकअप गुगल ड्राइव्ह अथवा वर घेतले असेल तर हे रिस्टोर करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या एन्क्रिप्शनची गरज लागत नाही. त्यामुळे तुमच्या गुगल अथवा अॅपल अकाउंटचा अॅक्सेस कोणाला मिळाल्यास चॅट्स बॅकअपला अॅक्सेस केले जाऊ शकते. मात्र, नवीन फीचर आल्यावर पासवर्ड अथवा एन्क्रिप्शन की शिवाय अॅक्सेस मिळणार नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wRRLJG