नवी दिल्ली. चा वापर लाखो भारतीय करतात. हे वेगळे सांगायची गरज नाही. मित्र- मैत्रिणींसोबत चॅट्स करण्यासाठी हे सर्वात चांगले माध्यम आहे. पण, बरेच लोक यात गोपनीयतेसाठी ब्लू टिक्सचा पर्याय काढून टाकतात. यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठविलेला मेसेज त्याने वाचला की नाही हे कळत नाही. कधी- कधी यामुळे वैतागही येतो. अशात, समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे की, नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ते माहित करण्यासाठी काही सोप्प्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. व्हॉट्सअॅपमध्येच ही ट्रिक आहे. पाहा डिटेल्स. वाचा: म्हणजे काय समोरच्या व्यक्तीने मेसेजे वाचला आहे की, नाही हे ब्लू टिक दर्शवते. जेव्हा मेसेजवर एकच टिक येते, तेव्हा मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला नसतो , तर डबल टिक म्हणजे तुमचा मेसेज पोहोचला आहे. परंतु, समोरच्या व्यक्तीने तो वाचला नाही. तर ब्लू टिकचा अर्थ समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे असा होतो. या स्टेप्स करा फॉलो सर्वप्रथम WhatsApp उघडा आणि तुम्हाला मेसेज करायचा आहे त्यांचे चॅट्स उघडा. मेसेज पाठ्वल्यानतंर समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला आहे की नाही हे माहित करण्यासाठी त्याला व्हॉईस नोट पाठवा. व्हॉईस नोट पाठवल्यानंतर, आपल्या प्रोफाइल फोटोच्या पुढे आपल्याला हिरवा माइक दिसेल, पाठविलेली व्हॉइस नोट समोरच्या व्यक्तीने ऐकल्या शिवाय रंग बदलणार नाही. समोरच्या व्यक्ती ने तुमची व्हॉईस नोट प्ले करताच हिरव्या रंगात दिसणारा हा माईक निळ्या रंगात दिसेल. सोबतच इतर ग्रे टिक्स देखील ब्लू होतील. आणि समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज वाचला आहे हे तुम्हाला माहित होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l34gQy