Full Width(True/False)

९९ रुपयात मिळताहेत Xiaomi प्रोडक्ट्स, मोबाइल आणि लॅपटॉपवर बंपर सूट

नवी दिल्लीः पॉप्युलर कंपनी Xiaomi ला भारतात ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने एक सेल सुरू केला आहे. शाओमी कंपनीने Mi seventh anniversary sale १२ जुलै ते १६ जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान कंपनीच्या स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि अॅक्सेसरीजपासून खूप साऱ्या प्रोडक्ट्सवर बंपर सूट दिली जात आहे. रोज सायंकाळी ४ वाजता ग्राहकांना मी इलेक्ट्रिक टूथब्रश, मी होम सिक्योरिटी कॅमेरा आणि ईयरफोन्स सारख्या प्रोडक्ट्स फक्त ९९ रुपयात खरेदी करू शकता येतील. वाचाः फोनवर ११ हजार रुपयांपर्यंत सूट Mi 10T Pro स्मार्टफोनला ११ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. सेलमध्ये या फोनची किंमत ३६ हजार ९९९ रुपये आहे. Mi 10T स्मार्टफोनचे 8GB+128GB व्हेरियंटवर ८ हजार रुपयांची सूट मिळत आहे. सूट नंतर फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे. याच प्रमाणे Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरियंटवर ७ हजार रुपयांची सूट दिल्यानंतर या फोनला १५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. वाचाः अन्य प्रोडक्ट्सवर कंपनीच्या वायरलेस ईयरफोन्स Mi True Wireless Earphones 2 ला २५०० रुपयांच्या सूटनंतर २ हजार ९९९ रुपयात, Mi Notebook 14 Horizon i7 लॅपटॉप ९ हजार ७७७ रुपयाच्या सूटनंतर ५० हजार २२२ रुपये आणि ७७७७ रुपयांच्या सूटनंतर Mi Smart Water Purifier फक्त ७ हजार २२२ रुपयात खरेदी करू शकता. याच प्रमाणे कंपनीच्या वायरलेस ईयरबड्स Redmi Earbuds 2C ला १ हजार रुपयांच्या सूटनंतर ९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः ९९ रुपयात मिळताहेत हे प्रोडक्ट्स शाओमी आपल्या काही प्रोडक्ट्सवर स्पेशल डील ऑफर करीत आहे. या प्रोडक्ट्सला सायंकाळी ४ वाजता फक्त ९९ रुपयात खरेदी करू शकता. मंगळवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ९९ रुपयात जे सामान खरेदी करू शकता त्यात Mi Home Security Camera आणि Redmi Earphones Redचा समावेश आहे. याची वास्तविक किंमत २२९९ रुपये आणि ५९९ रुपये आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UJSU92