नवी दिल्ली. नामांकित कंपनी शाओमी भारतात ७ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने चिनी कंपनीतर्फे आयोजित करण्यात आला आहे. हा सेल १२ जुलैपासून सुरू झाला असून १६ जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. यात कंपनी सर्व प्रकारच्या प्रोडक्ट्सवर उत्तम ऑफर देत आहे. जाणून घ्या कोणत्या प्रोडक्टवर कंपनीतर्फे किती सवलत देण्यात येत आहे. वाचा: Mi LED TV 4A Pro 32 इंच या सेलमध्ये शाओमी स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट देण्यात येत आहे . Mi LED TV 4A Pro 32 इंच टीव्ही १५,९९९ रुपयांमध्ये सेलमध्ये लिस्ट आहे. परंतु, एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे या टीव्हीवर २० टक्के त्वरित सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील ग्राहकांना यावर घेता येईल. मीएआय वर्धापन दिन सेलच्या निमित्ताने कंपनी केवळ १ रुपयात एक्स्टेन्डेड वॉरंटी देत आहे. याशिवाय टीव्ही खरेदी केल्यास सोबत मी वाय-फाय स्मार्ट स्पीकर १,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Mi TV 4A 40 इंच ४० इंचाचा मी टीव्ही ४ ए सेलमध्ये २२, ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे खरेदी केल्यास टीव्हीवर १० टक्के त्वरित सवलत देखील उपलब्ध आहे. यासह नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील यात घेता येईल. कंपनीतर्फे ६९९ रुपये किंमतीची एमआय एक्स्टेन्डेड वॉरंटी केवळ १ रुपयात देण्यात आहे. याशिवाय फ्री डिलिवरी, फ्री इंस्टॉलेशन सर्विस, १० दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी देखील यात आहे. Mi TV 4A 40 इंच Horizon Mi TV 4A 40 Inch Horizon टीव्ही २४,९९९ रुपयांमध्ये विक्रीमध्ये लिस्ट आहे. टीव्ही एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारावर खरेदी केल्यास १० टक्के सूट मिळेल. नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील ग्राहकांना यावर घेता येईल. कंपनीतर्फे ६९९ रुपये किंमतीची एमआय एक्स्टेन्डेड वॉरंटी १ रुपयात देण्यात येऊ शकते. तसेच, १० दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी देखील यात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hCA24w