Full Width(True/False)

'शेरशाह'साठी सिद्धार्थनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारही लखपती

मुंबई : कारगिल युद्धातील हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांचा बायोपिक असलेला '' हा सिनेमा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमाने IMDb वर ८.९ इतके रेटिंग मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तो हिंदीतील 'टॉप रेटेट' सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचे केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही भरभरून कौतुक होत आहे. अभिनेता म्हणून सिद्धार्थ मल्होत्राचा हा आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याची चर्चा आहे. तर कियारा आडवाणी देखील या सिनेमात खूपच सुंदर दिसली आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मोठ्या पडद्यावर कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिम्पल चीमा या भूमिका साकारण्यासाठी सिद्धार्थ आणि कियाराने किती मानधन घेतले? सिद्धार्थने घेतले ७ कोटी मानधन शेरशाह हा सिनेमा १२ ऑगस्ट २०२१ ला रिलीज झाला आहे. हा सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटला आहे. त्यानंतर आता या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले याची माहिती समोर आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात ७ कोटी रुपये इतके सर्वाधिक मानधन सिद्धार्थ मल्होत्राने घेतले आहे. या सिनेमासाठी सिद्धार्थने खूप मेहनत घेतली तसेच खडतर प्रशिक्षणही घेतले होते. बंदूक चालवण्यापासून ते आपल्या फिटनेसपर्यंत सिद्धार्थने कठोर मेहनत घेतली होती. कियारा आडवाणीने घेतले ४ कोटी मानधन शेरशाह या सिनेमात कॅप्टन विक्रम पत्रा यांच्या गर्लफ्रेंडची डिम्पल चीमा ही भूमिका कियारा आडवाणीने साकारली. या सिनेमात कियाराच्या भूमिकेची लांबी फार नाही. परंतु जेव्हा ती पडद्यावर दिसली तेव्हा तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या प्रसंगामध्ये कियाराने जो अभिनय केला आहे, त्याला तोड नाही... या भूमिकेसाठी कियाराने ४ कोटी रुपये इतके मानधन घेतले आहे. निकितन धीरनेही घेतले लाखो रुपये मानधन या सिनेमातील बाकीच्या कलाकारांच्या मानधनाबाबत सांगायचे तर मेजर अजय सिंह जसरोटिया ही भूमिका निकितन धीरने साकारली आहे. या सिनेमात त्याची अर्ध्या तासाची भूमिका आहे. त्यासाठी त्याने ३५ लाख रुपये मानधन घेतले. शिव पंडितने घेतले ४५ लाख रुपये अभिनेता शिव पंडितने या सिनेमात लेफ्टनंट संजीव जिम्मी जामवाल ही भूमिका साकारली आहे. त्याने या भूमिकेसाठी ४५ लाख रुपये मानधन घेतले आहे. पवन कल्याण आणि मीर सरवरनेही घेतले तगडे मानधन कॅप्टन विक्रम बत्राच्या वडिलांचे जीएल पत्रा यांची भूमिका पवन कल्याणने साकारली आहे. त्यांनी ५० लाख रुपये मानधन घेतले आहे. तर मीर सरवरने २५ लाख रुपये मानधन घेतले आहे. या सिनेमात मीरने हैदरची भूमिका साकारली आहे. अनिल चरणजीतने घेतले २५ लाख रुपये शेरशाह सिनेमात विक्रम बत्रांच्या खास मित्र सुभेदार बंसी लाल ही भूमिका अनिल चरणजीतने साकारली. या भूमिकेसाठी त्याने २५ लाख रुपये इतके मानधन घेतले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ymQ4oA