नवी दिल्लीः Redmi Smartphones under 20000: दमदार फीचर्सने फुल लोडेड असलेला स्मार्टफोनच्या शोधात तुम्ही जर असाल तसेच डिस्काउंट साठी तुम्ही एखाद्या सेलची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कोणत्याही सेलविना तुम्ही स्मार्टफोनला डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. रेडमी मोबाइल सोबत अनेक ऑफर्स लिस्ट करण्यात आले आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि ऑफर्स संबंधी. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज दिला आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 732G चिपसेट सोबत ८ जीब पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. बॅक पॅनेलवर चार रियर कॅमेरे दिले आहेत. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यात 5020mAh ची बॅटरी दिली आहे. रिटेल बॉक्स सोबत ३३ वॉटचे फास्ट चार्जर मिळणार आहे. रेडमीच्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी मॉडलची किंमत १७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. फोनला स्वस्तात खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईझी ईएमआय द्वारे पेमेंट केल्यास १५०० रुपयापर्यंत इंस्टेंट डिस्काउंट आणि जुना फोन एक्सचेंज केल्यास ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळतो. डिस्काउंटचा पूर्ण लाभ मिळाल्यास १२ हजार ५०० रुपयांपर्यत बचत होऊ शकते. वाचा: वाचा: वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sYvbPo