Full Width(True/False)

SpO2 मॉनिटर आणि १४ दिवसांच्या बॅटरी लाईफसह Mi Band 6 भारतात लाँच ,पाहा किंमत फीचर्स

नवी दिल्ली : Xiaomi कंपनीतर्फे आज भारतात स्मार्ट लिव्हिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान Xiaomi Mi Smart Band 6 सह एकूण ६ नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्यात आले. ची विक्री भारतात ३० ऑगस्टपासून सुरू होणार असून Mi Smart Band 6 ची किंमत ३,४९९ रुपये आहे. ते शाओमीच्या वेबसाइट आणि offline Amazon इंडिया, एमआय होमसह ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. वाचा: Mi Band 6 मध्ये १.५६ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याची चमक ४५० nits आहे. यात ८० कस्टमाईज करण्यायोग्य वॉच फेसेस आहेत. कंपनीच्या मते, वॉच ३० व्यायामाच्या प्रकारांचा मागोवा घेऊ शकते. Mi Band 6 मध्ये हार्ट रेट मॉनिटर सुद्धा देण्यात आला आहे. याशिवाय, त्यात रक्ताचा ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर देखील देण्यात आला आहे, ज्याला एसपीओ २ असेही म्हणतात. या फिटनेस बँडची स्क्रीन मागील आवृत्तीपेक्षा ५० % अधिक आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक कस्टमाईज पर्याय दिले आहत. Mi Smart Band 6 मध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि डोळ्यांची जलद हालचाल सारखी वैशिष्ट्ये असून यात स्ट्रेस मॉनिटर वैशिष्ट्यासह खोल श्वास मार्गदर्शन देखील आहे. कंपनीचा दावा आहे की, वॉच १४ दिवसांची बॅटरी लाईफ देईल. हा फिटनेस बँड 5ATM पाणी प्रतिरोधक आहे. Mi Band 6 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० देण्यात आला आहे. हे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीशी कनेक्ट केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला Play Store किंवा App Store वरून Mi Fit अॅप डाउनलोड करावे लागेल. यावेळी कंपनीने वेगळ्या प्रकारचे चार्जर देखील दिले आहे. मागच्या वेळेप्रमाणे या वेळी डॉक सिस्टीम नाही, पण काही पिन आहेत. जे, अगदी सुलभ आणि वापरण्यास अतिशय सोपे आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kueYNW