Full Width(True/False)

‘या’ अ‍ॅप्सच्या मदतीने फोनमध्ये सेव्ह करू शकता ड्रायव्हिंग लायसन्स, पोलिसांनी पकडल्यावर येईल उपयोगी

नवी दिल्ली : गाडी चालवताना तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. लायसन्सची हार्ड कॉपी नेहमी जवळ बाळगण्याऐवजी तुम्ही सॉफ्ट कॉपी फोनमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. यासाठी आणि सारख्या अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. वाचा: ड्रायव्हिंग लायसन्स मोबाइलमध्ये डाउनलोड करणे खूपच सोपे आहे. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी DigiLocker किंवा mParivahan अ‍ॅप्समध्ये ठेवली तरीही तुमची चलान कापले जाणार नाही. मोबाइलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी असल्याने ह्याच्या हरवण्याची देखील भिती राहत नाही. २०१८ मध्ये सरकारने एक सुचना जारी केली होती की, गरज पडल्यास DigiLocker किंवा mParivahan अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी फोनमध्ये कशी स्टोर करू शकता, याबाबत जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे अकाउंट DigiLocker वर असणे गरजेचे आहे. तुम्ही DigiLocker वर फोन नंबर आणि आधार कार्डने साइनअप करू शखता. यासाठी DigiLocker च्या अ‍ॅप अथवा साइटवर जाऊन यूजरनेम आणि सहा आकडी पिनने साइनअप करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड फोनवर वन टाइम पासवर्ड मिळेल. आता तुम्हाला सर्च बारमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स दिसेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. त्यानंतर लायसन्स नंबर टाकून Get Document वर क्लिक करा. DigiLocker मध्ये Issued Documents लिस्टवर जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता. याची सॉफ्ट कॉपी देखील पीडीएफ बटनवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. तुम्ही फोनमध्ये देखील ही फाइल सेव्ह करून ठेवू शकता. तसेच, तुम्ही mParivahan ला देखील डाउनलोड करून फोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स सेव्ह करून ठेवू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DfZUfH