Full Width(True/False)

Xiaomi Mi 12 आणि Mi 12 Ultra मध्ये 200MP कॅमेरा, पाहा सर्व डिटेल्स

नवी दिल्लीः Xiaomi ची नवीन फ्लॅगशीप सीरीज Mi 12 ला घेवून येण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कंपनी यावर्षीच्या अखेर पर्यंत किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला Ultra आणि Xiaomi Mi 12 स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. लाँच आधीच शाओमीचे फ्लॅगशीप फोन संबंधी ऑनलाइन माहिती लीक झाली आहे. सध्या मी ११ आणि मी ११ अल्ट्रा मध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सारखी खास फीचर्स दिली आहेत. Xiaomi Mi 12 Ultra, Mi 12 कॅमेरा डिटेल आली समोर शाओमीकडून मी १२ सीरीजला या वर्षी लाँच केले जावू शकते. XiaomiUI च्या माहितीनुसार, मी १२ सीरीज मध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी शाओमी फ्लॅगशीप फोन्समध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. सध्या शाओमीने कॅमेरा डिटेल्स वरून कोणतीही माहिती स्पष्ट केली नाही. XiaomiUI ने हा ही दावा केला आहे की, मी १२ अल्ट्रा मॉडलचे कोडनेम Zeus आहे. यात ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा लेन्स दिले आहे. पेरिस्कोप लेन्स 10x झूम सोबत येईल. तर स्टँडर्ड मी १२ स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाइड आणि मायक्रो कॅमेरा दिला जाणार आहे. आता या व्हेरियंटचे सेन्सरची माहिती उघड झाली नाही. मी १२ आणि मी १२ अल्ट्रा मध्ये टॉप अँड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८९८ प्रोसेसर मिळेल. याआधी माहिती समोर आली होती की, मी १२ सीरीज मध्ये LPDDR5X रॅम दिला जाणार आहे. LPDDR5 चे X व्हर्जन याच आठवड्यात आणले जातील. सध्या, स्नॅपड्रॅगन ८८८ आणि स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट LPDDR5X रॅम सपोर्ट करीत नाही. आगामी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८९८ प्रोसेसर LPDDR5X सपोर्ट सोबत येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38jDk7t