नवी दिल्ली : सरकारद्वारे जारी केले जाणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रं आहे. निवडणूक आयोगाद्वारे हे कार्ड जारी केले जाते. याचा सर्वाधिक उपयोग निवडणुकीच्या वेळी मतदान करताना होतो. याशिवाय ओळखपत्र म्हणून, वयाचा पुरावा म्हणून व अन्य कागदपत्रांसाठी देखील याचा वापर केला जातो. वाचा: मात्र, अनेकदा मतदान ओळखपत्रात काही चुका होतात, ज्या दुरुस्त करणे गरजेचे आहे. जर तुमच्या मतदान ओळखपत्रात काही चुका असल्यास तुम्ही घरबसल्या देखील त्यात दुरुस्ती करू शकता. मतदान ओळखपत्रातील पत्ता, जन्मतारीख कशी दुरुस्त कराल याविषयी जाणून घेऊया. पत्ता कसा बदलाल?
  • सर्वात प्रथम राष्ट्रीय मतदान सेवा पोर्टल www.nvsp.in वर जा व लॉगइन करा.
  • तुम्ही जर इतर मतदारसंघात राहण्यासाठी गेला असाल व नवीन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास फॉर्म ६ वर क्लिक करा.
  • जर तुम्ही एकाच मतदारसंघात दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला असल्यास फॉर्म ८ वर क्लिक करा.
  • आता तुमचे नाव, जन्मतारीख, मतदारसंघ, सध्याचा पत्ता इत्यादी माहिती भरा.
  • तसेच, ईमेल, मोबाइल नंबर टाका.
  • आता फोटोग्राफ, पत्त्याचा पुरावा व वय इत्यादी कागदपत्रं अपलोड करा.
  • आता सर्व कागदपत्रांसह फॉर्म ऑनलाइन जमा करा.
  • आता डिक्लेरेशन भरून कॅप्चा टाका. सर्व डिटेल्स तपासून सबमिट बटनवर क्लिक करा.
जन्मतारीख कशी बदलाल?
  • सर्वात प्रथम www.nvsp.in वर जाऊन लॉगइन करा.
  • येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. यातील Correction in पर्यायावर क्लिक करा.
  • आता correction in Age वर क्लिक करा व त्यानंतर तुम्हाला जी तारीख बदलायची आहे ती टाका.
  • आता संबंधित कागदपत्र अपलोड करा.
  • आता डिक्लरेशन पर्याय भरून सर्व माहिती तपासा. सबमिट बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर रेफ्रेंस आयडी जनरेट होईल. याचा उपयोग स्टेट्स ट्रॅक करण्यासाठी करू शकता.
नाव कसे बदलाल?
  • सर्वात प्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल www.nvsp.in वर जाऊन लॉगइन करा.
  • येथे आपको पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर correction in Name वर क्लिक करून योग्य नाव टाका.
  • त्यानंतर पुराव्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं जोडा.
  • आता डिक्लरेशन ऑप्शनवर क्लिक करा. सर्व माहिती तपासून सबमिट बटनवर क्लिक करा.
  • आता रेफ्रेंस आयडी जमा होईल. याचा उपयोग करून स्टेट्स ट्रॅक करू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kB8jSj