नवी दिल्ली : टेक दिग्गज आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक शानदार बनवण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आपल्या सर्च प्लॅटफॉर्मवर सर्वात लोकप्रिय फीचर पैकी एक ला रोल आउट केले आहे. कंपनीने वेबवर डेस्कटॉपसाठी हे फीचर लाँच केले आहे. फेब्रुवारीपासून या फीचरचे टेस्टिंग सुरु होते. या फीचरला गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सर्वात प्रथम स्पॉट करण्यात आले होते. वाचा: कंपनीने डार्क मोडला डेस्कटॉप यूजर्ससाठी रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही आठवड्यात सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहेत. तुम्ही देखील हे फीचर सहज अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. Google ने एका सपोर्ट पेजच्या माध्यमातून खुलासा केला आहे की, डार्क थीम गुगल होमपेज, सर्च रिझल्ट पेज आणि सर्च सेटिंग्ससाठी लागू होईल. हे फीचर इनेबल केल्यानंतर यूजर्सला वेब ब्लॅक रंगात दिसेल. हे एकप्रकारे ब्लॅक थीम असते, हे इनेबल केल्यानंतर मोबाइलमध्ये डार्क थीमचा इफेक्ट मिळतो. डार्क मोड ऑपरेटिंग सिस्टम अथवा अ‍ॅप्लिकेशनचा रंग बदलून काळा करते. डार्क मोड ऑन केल्याने फोनच्या बॅटरीची बचत होते. सोबतच, डोळ्यांसाठी देखील चांगले असते. ब्राइटनेस जास्त असल्यावर डोळ्यांवर परिणाम होत असतो. डार्क मोडमुळे हा धोका कमी होतो. कंपनीचे प्रोडक्ट सपोर्ट मॅनेजर, हंग एफ म्हणाले की, मला सांगताना आनंद होत आहे की, आजपासून पुढील काही आठवड्यांमध्ये डार्क थीम डेस्कटॉपवर पेजसाठी उपलब्ध होईल. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. तुम्हाला देखील ही सुविधा हवी होती. डार्क मोड थीम अंतर्गत यूजर्सला लाइट, डार्क आणि डिव्हाइस डिफॉल्ट असे तीन कलर पर्याय मिळतील. तिसऱ्या पर्यायाचा वापर लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरच्या डिफॉल्ट सेटिंग्सला एडजस्ट करण्यासाठी केला जाईल. डेस्कटॉपवर Google सर्च डार्क मोड कसे अ‍ॅक्टिव्हेट कराल?
  • सर्वात प्रथम कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये गुगल सर्च ओपन करा.
  • उजव्या बाजूला वरती सेटिंग्सचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
  • Search सेटिंग्समध्ये गेल्यावर Appearance पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या आवडीचा कलर पर्याय निवडा व सेव्हवर क्लिक करा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hpiyII