नवी दिल्ली: , यूआयडीएआयने जारी केलेले एक अतिशय महत्वाचे दस्तऐवज असून ते भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अनिवार्य आहे. आधारद्वारे तुम्ही बँकेत खाते उघडण्यासारखे सर्व बँकिंग संबंधी काम करू शकता. याव्यतिरिक्त पॅन कार्ड किंवा आयकर सारख्या इतर आर्थिक कामासाठी अर्ज करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आजच्या काळात सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य आहे हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. सर्व नागरिकांना हे बायोमेट्रिक युनिक आयडेंटिटी कार्ड देण्यासाठी देशाचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु, अनेक नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्यामुळे हे काम म्हणावे तितके सोप्पे देखील नाही. वाचा: वेबसाइटच्या नवीन आकडेवारीनुसार, आतापर्यंत १२३ कोटी लोकांना दस्तऐवज पुरावे देण्यात आले असून ज्यांच्याकडे वैध कागदपत्र किंवा पुरावा नाही ते देखील आता वैध कागदपत्रांशिवाय मिळवू शकणार आहेत. कागदपत्रांशिवाय आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा? जर तुम्हाला आधार कार्डसाठी अर्ज करायचा असेल आणि तुमच्याकडे यासाठी वैध ओळख आणि पत्ता पुरावा दस्तऐवज नसेल तर तुम्ही कागदपत्रांशिवायही अर्ज करू शकता. कागदपत्रांशिवाय आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी UIDAI द्वारे अधिकृत परिचयकर्त्याची मदत घ्यावी लागेल. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • तुमच्या जवळच्या आधार नाव नोंदणी केंद्राला भेट द्या.
  • सर्व तपशील योग्यरित्या नमूद करून आधार नोंदणी/दुरुस्ती फॉर्म भरा.
  • रजिस्ट्रार किंवा आधार क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ओळखल्या गेलेल्या आणि अधिसूचित केलेल्या परिचयकर्त्याद्वारे फॉर्म प्रमाणित करा.
  • आधार एक्झिक्युटिव्हला फॉर्म सबमिट करा.
  • आपला बायोमेट्रिक डेटा जसे फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि छायाचित्र प्रदान करा. त्यानंतर एक स्लिप तयार केली जाईल, ज्यात नोंदणी क्रमांक असेल.
  • ज्याचा वापर आधार कार्ड स्टेटस तपासण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • आधार कार्ड नोंदणीच्या ९० दिवसांच्या आत आधार कार्डमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर आधार कार्ड पाठवले जाईल.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WPMVR0