Full Width(True/False)

Apple iPhone 13 Launch:भारतात आज किती वाजता लाँच होणार iPhone 13? येथे पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग

नवी दिल्ली: फोनबद्दल जगभरात बरीच चर्चा आणि उत्सुकता आहे. फोनची रचना कशी असेल, बॅटरी किती मोठी असेल, कॅमेरा किती जबरदस्त असेल. या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लाँच इव्हेन्टमध्ये मिळतील. भारतात हा इव्हेन्ट कोणत्या वेळी लाइव्ह असेल आणि कसा बघता येईल? त्याविषयी जाणून घ्या.. वाचा: iPhone 13 भारतात कधी लाँच होणार ? Apple आज, मंगळवारी एका विशेष "" या लाँच इव्हेंटमध्ये iPhone 13 लाँच करण्यासाठी सज्ज आहे असून या वर्षी टेक दिग्गज iPhone 13 लाइनअप आणि Apple वॉच सीरीज 7 तसेच नवीन आयपॅड आणि मॅकचे अनावरण देखील करू शकते . हा कार्यक्रम कॅलिफोर्नियामध्ये सकाळी १० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम भारतात रात्री साडेदहा वाजता लाईव्ह असेल. लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल ? कोविडमुळे, Apple लाँच इव्हेंट गेल्या वर्षीप्रमाणेच व्हर्च्युअल असेल. तुम्ही तो यूट्यूबवर लाईव्ह पाहू शकता. खाली दिलेल्या लाईव्ह स्माईलिंग लिंकवर क्लिक करून तुम्ही लाईव्ह पाहू शकाल. iPhone 13 मालिका iPhone 12 मालिकेप्रमाणेच चार प्रकारात येण्याची शक्यता आहे. iPhone 13 Mini , iPhone 13 , iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल लाँच केले जाऊ शकतात. iPhone 13 Mini मध्ये ५.४ इंच स्क्रीन असेल आणि iPhone 13 आणि 13 Pro मध्ये 6.1-इंच स्क्रीन मोठी असेल. iPhone 13 Pro max मध्ये ६.७ इंचांचा सर्वात मोठा डिस्प्ले असेल. iPhone 13 Pro आणि Pro Max मध्ये ऑल्वेज -ऑन डिस्प्ले iPhone 13 प्रो आणि iPhone 13 Pro Max एलटीपीओ पॅनेलसह डायनॅमिक १२० हर्ट्ज प्रमोशन रिफ्रेश रेटसह येण्याची अपेक्षा आहे. दोन प्रो मॉडेल्समध्ये नेहमी ऑन डिस्प्ले फीचर देखील येऊ शकते. तसेच, iPhone 13 Mini आणि iPhone 13 मध्ये एलटीपीओ पॅनेल आणि ऑल्वेज ऑन डिस्प्ले मिळण्याची शक्यता कमी आहे. iPhone 13 Pro 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध असेल प्रतिष्ठित विश्लेषक मिंग-ची कुओ यांच्या मते, iPhone 13 लाइनअप १२८ जीबी स्टोरेजसह सुरू होईल, कोणत्याही मॉडेलसाठी ६४ जीबीचा पर्याय नाही. मॅक्रूमर्सच्या अहवालानुसार, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max १ टीबी पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध असतील, जे iPhone मोबाईलद्वारे देण्यात आलेले सर्वात मोठे स्टोरेज असेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k8AmcH