Full Width(True/False)

जबरदस्त! Infinix Zero X स्मार्टफोन सीरिज लाँच, मिळतील भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : Zero X, आणि Zero X Neo लाँच झाले आहे. हे नवीन मॉडेल्स कॅमेरा फोक्सड आहे. यामध्ये पेरिस्कोप लेंस देण्यात आली आहे. कंपनीनुसार, या सेटअपद्वारे यूजर्सला हाय-रिझॉल्यूशन मून शॉट्स घेऊ शकता. मध्ये ड्यूल सेल्फी फ्लॅश सपोर्ट देखील मिळेल. तसेच ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या सीरिजच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Infinix Zero X, Zero X Pro, ची किंमत आणि उपलब्धता Infinix Zero X, आणि Infinix Zero X च्या किंमतीची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार, याची सुरुवाती किंमत ३०० डॉलर्स (जवळपास २२,१०० रुपये) असू शकते. Infinix Zero X ला नेबुला ब्लॅक आणि स्टारी सिल्वर रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. तर Infinix Zero X Pro नेबुला ब्लॅक, स्टारी सिल्वर आणि टस्कनी ब्राउन ह्यूज रंगात येतो. Infinix Zero X Neo हा नेबुला ब्लॅक, स्टारी सिल्वर आणि बहामास ब्लू रंगात येतो. भारतात या सीरिजला कधी लाँच केले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. Infinix Zero X चे फीचर्स: ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS ७.६ वर काम करतो. यामध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:9 आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी९५ चिपसेटसह येतो. यामध्ये ८ जीबी रॅम दिली आहे. रॅमला ३ जीबीपर्यंत वाढवू शकता. यात १२८ जीबी स्टोरेज दिले असून, मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि तिसरा ८ मेगापिक्सल पेरिस्कोप सेंसर आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर दिला आहे. यात ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. Infinix Zero X Pro चे फीचर्स: ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS ७.६ वर काम करतो. यामध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:9 आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G९५ SoC सोबत ८ जीबी रॅम मिळेल. यात १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेंसर १०८ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि तिसरा ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. Infinix Zero X Neo चे फीचर्स: फोन ड्यूल सिम सपोर्टसह येते. हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS ७.६ वर काम करतो. यामध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:9 आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G९५ SoC सोबत ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मिळते. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि तिसरा ८ मेगापिक्सल पेरिस्कोप सेंसर आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Infinix XE20, XE25चे फीचर्स: Infinix XE20 TWS हेडसेटचा लेटेंसी रेट ६० मिलीसेकंद आहे. हे १०एमएम हाय कंपोसिट डायफाग्रामसह येतात. Infinix XE25 मध्ये ईएनसी नॉइस कॅन्सिलेशन आणि सुपर लो-लेटेंसी फीचर्स दिले आहे. हे १०० तास प्लेबॅक टाइम देण्यास सक्षम आहे. Infinix XE25 मध्ये एक एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. डिव्हाइसच्या किंमत आणि उपलब्धतेबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nxbRYO