नवी दिल्ली : अ‍ॅपलच्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटची घोषणा झाली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, १४ सप्टेंबरला इव्हेंटचे आयोजन केले जाईल. या इव्हेंटमध्ये नवीन आयफोन्ससह इतर प्रोडक्ट्स लाँच केले जातील. यामध्ये आयफोन १३, आयफोन १३ मिनी, आणि आयफोन १३ प्रो मॅक्सचा समावेश आहे. हे आयफोन १२ सीरिजप्रमाणेच असेल. कंपनीने १४ सप्टेंबरच्या इव्हेंटसाठी मीडिया इन्वाइट पाठवण्यात आले आहे. यात कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग लिहिले आहे. वाचा: अ‍ॅपलने हा इव्हेंट व्हर्च्यूअली आयोजित केला जाईल अशी माहिती दिली आहे. यूजर्स या इव्हेंटला कंपनीच्या अधिकृत साइटवरून पाहू शकतील. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील इव्हेंटचे आयोजन अ‍ॅपल पार्कमध्येच केले जाईल. भारतीय वेळेनुसार इव्हेंटला रात्री १०.३० वाजता सुरुवात होईल. आयफोन १३ सीरिजबद्दल सांगायचे तर यात ४ मॉडेल्स असतील. यातील आयफोन १३ मिनीमध्ये ५.४ इंचाचा डिस्प्ले असेल. आयफोन १३ आणि १३ प्रो मध्ये ६.१ इंच, आयफोन १३ प्रो मॅक्स मॉडेलमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले असेल. रिपोर्टनुसार, आयफोन १३ मध्ये एक लहान डिस्प्ले नॉच मिळेल. यावेळी कंपनी कॅमेरा अपग्रेड देखील करणार आहे. याशिवाय ए१५ चिप आणि १२० हर्ट्ज प्रोमोशन डिस्प्ले सपोर्ट मिळेल. डिझाइनच्या बाबतीत कंपनी यात बदल करेल, यामध्ये कॅमेरा लेंस प्लेसमेंट आणि साइज, डिस्प्ले नॉचचा समावेश आहे. डिस्प्लेची साइज मात्र आयफोन १२ सीरिजप्रमाणेच असेल. रिपोर्टनुसार, थोडी जाड असेल. कारण यात जास्त क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही सीरिज मॅट ब्लॅक रंगात येईल. संपूर्ण आयफोन १३ सीरिजमध्ये सेंसर शिफ्ट स्टॅबिलाइजेशन पाहायला मिळेल. प्रो मॉडेल्सच्या अल्ट्रा वाइड लेंसमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. कॅमेऱ्याच्याबाबतीत दोन मोठे बदल पाहायला मिळतील. यात एक सिनेमॅटिक व्हीडिओ आणि दुसरा ProRes व्हीडिओ फॉर्मेट असेल. किंमतीबद्दल सांगायचे तर आयफोन १३ सीरिज ही आयफोन १२ सीरिजपेक्षा महाग असेल. चिप शॉर्टेजच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कंपनी असे करत आहे. नवीन आयफोन १३ सीरिजसह कंपनी नवीन देखील लाँच करू शकता. इव्हेंटमध्ये एअरपॉड्स ३ ला देखील सादर करू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yWv7kq