नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसवर बेस्ड गेम 'सेलमॉन भोई' (Selmon Bhai) वर मुंबई सिव्हिल कोर्टाने बंदी घातली आहे. न्यायाधीश के. एम. जायस्वाल यांनी यावर बंदी घातली आहे. हा गेम बनवणारी कंपनी पॅरोडी स्टूडिओज प्रायव्हेट लिमिटेडला गेम आणि कोर्ट संबंधित कोणत्याही कंटेट किंवा प्रसार, त्याला लाँच करणे किंवा रिलाँच करणे किंवा रि प्रोड्युस करण्यावर बंदी घातली आहे. या गेमला गुगल प्ले स्टोर सह अन्य प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई सिव्हिल कोर्टाने म्हटले की, गेम आणि त्याचा फोटो पाहून दिसते की सलमान खानच्या हिट अँड रन केस संबंधित आहे. कोर्टाने म्हटले की, सलमान खान ने कधीच या गेमसाठी परवानगी दिली नाही. कोर्टाने आदेशात हेही म्हटले की, ज्यावेळी सलमान खानने या गेमिंगच्या मेकिंगसाठी आपली परवानगी दिली नाही. तसेच हे प्रकरण त्याच्या विरुद्ध प्रकरणाशी मिळते जुळते आहे. यात त्याचे वैयक्तिक अधिकाराचे हनन झाले आहे. तसेच त्याच्या इमेजलाही धक्का पोहोचला आहे. सलमान खानकडून याचिका गेम बनवणाऱ्या कंपनीला सलमान खानच्या प्रसिद्धीचा आर्थिक लाभ मिळावा यासाठी दुरुपयोग केला आहे. सलमान खानने गेम बनवणाऱ्या विरुद्ध गेल्या महिन्यात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले की, 'सेलमॉन भोई' चा उच्चार हा सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमान भाई पद्धतीने होत आहे. तसेच गुगल एलएलसी आणि गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवरही खटला दाखल केला आहे. गेमचे तीन स्टेज हा गेम पूर्णपणे हिट अँड रन केसवर बेस्ड आहे. यात सलमान खानच्या कार्टूनचा फोटोचा वापर केला आहे. सेलमॉन भोई गेम मध्ये तीन स्टेज आहेत. पहिल्या स्टेज मध्ये सेलमॉन भोई एक पार्क सी जागेवर हरण आणि व्यक्तीसारखी दिसणारा कॅरेक्टवर गाडी चालवतो, असे दिसते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DZzxL0