मुंबई : आपण सर्वजण टीव्हीवर रिअॅलिटी शो पाहत मोठे झाले आहोत. या रिअॅलिटी कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या कलागुणांनी आपल्या प्रत्येकाचे मनोरंजन केले आहे. हे सगळे रिअॅलिटी कार्यक्रम त्याचे सूत्रसंचालन करणाऱ्यांशिवाय अपूर्ण आहेत. सध्या टीव्हीवरून जे रिअॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात त्यातील परीक्षक आणि स्पर्धकांबरोबरच त्याचे सूत्रसंचालकही कमालीची लोकप्रिय झाले आहेत. काही कलाकार सूत्रसंचालक म्हणूनच प्रेक्षकांना जास्त भावले आहेत. अर्थात हे कलाकार या कामासाठी तगडे मानधन आकरतात. अशाच काही तगडे मानधन घेणाऱ्या लोकप्रिय सूत्रसंचालकांबाबत जाणून घेऊ या... आणि हर्ष लिबांचिया टीव्ही जगतातील भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ही जोडी कमालिची लोकप्रिय आहे. या दोघांनी एकत्रितपणे अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. भारती सिंग सूत्रसंचालन करण्यासाठी एका भागासाठी ६ ते ७ लाख रुपये घेत तर हर्ष एका भागासाठी ३ ते ४ लाख रुपये घेतो. आदित्य नारायण इंडियन आयडल १२ मुळे आदित्य नारायण सूत्रसंचालक म्हणून जास्त प्रकाशझोतात आला. आदित्यने इंडियन आयडल १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी एका भागासाठी काही लाखांच्या घरात मानधन आकारले आहे. याआधी आदित्यने सा रे गा मा पा या कार्यक्रमाचे २००९ मध्ये सूत्रसंचालन केले होते. मनीष पॉल मनीष पॉल टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. २०१२ पासून मनीष पॉल सातत्याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष पॉल एका कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी १.५ कोटी रुपये घेतो. सलमान खान अनेक वर्षांपासून बिग बॉस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्याची गणना टीव्ही विश्वातील सर्वात टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सूत्रसंचालकामध्ये केली जाते. सलमानला बिग बॉसच्या एका पर्वासाठी तगडे मानधन आकारतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉससाठी सलमान प्रत्येक भागासाठी २० कोटी रुपये आकारतो. अमिताभ बच्चन अनेक दशकांपासून 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी जेव्हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला सुरुवात केली तेव्हा ते प्रत्येक भागासाठी २५ लाख रुपये मानधन घ्यायचे. आता त्यांचे मानध वाढले असून ते प्रत्येक भागासाठी सुमारे ३ ते ५ कोटी रुपये आकारतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VmOTIi