Full Width(True/False)

'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी आहे तरी कोण? मालिकेसाठी कशी झाली तिची निवड?

मुंबई टाइम्स टीम '' या मालिकेचं कथानक आता काही वर्षं पुढे सरकलं आहे. या मालिकेतील हे वळण प्रेक्षकांनाही भावलं आहे. दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. या दोघींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आहे. मालिकेच्या ऑडिशनविषयी तिच्या आईला समजलं तेव्हा त्यांनी साईशाची ऑडिशन मालिकेच्या टीमला पाठवली. त्यानंतर तिची या मालिकेसाठी लगेच निवडही झाली. साईशा मुळची कल्याणची. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड आहे. तसंच तिला स्वयंपाक करायलाही खूप आवडतो. 'रंग माझा वेगळा' ही मालिका तिच्या घरी आवर्जून पाहिली जाते. त्यामुळे साईशाला या मालिकेतील प्रत्येक पात्र पहिल्यापासून ओळखीचं आहे. तिचा सेटवरचा पहिला दिवस तिच्यासाठी खूपच खास होता. तिच्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटून तिला फारच आनंद झाला. कार्तिकी म्हणून 'रंग माझा वेगळा'च्या संपूर्ण टीमसह ती अगदी सहजपणे मिसळून गेली. सेटवरही ती सर्वांची लाडकी आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EGrzqI