Full Width(True/False)

६ कॅमेराच्या स्मार्टफोनवर ३५०० रुपयांची सूट, स्वस्त किंमतीत फोन खरेदीची संधी

नवी दिल्लीः जर तुम्ही १५ ते २० हजार रुपयाच्या बजेट किंमतीत एक चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ६ कॅमेराचा स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. या फोनवर ३५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. फोनमध्ये चार रियर कॅमेरा, दोन फ्रंट कॅमेरे आणि 4015 mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio P95 प्रोसेसर सारखे फीचर्स मिळत आहेत. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फीचर्स संबंधी डिटेल्स. फोनची किंमत आणि ऑफर्स हा फोन एकाच व्हेरियंट मध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मध्ये येतो. ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर फोन १९ हार ९९० रुपयाच्या किंमतीत लिस्टेड आहे. परंतु, याला शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट द्वारे कमी किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ओप्पो एफ १७ प्रो स्मार्टफोन १७ हजार ९९० रुपयाच्या किंमतीत विकला जात आहे. म्हणजेच थेट २ हजार रुपयाचा डिस्काउंट आहे. याशिवाय, फ्लिपकार्टवर SBI Credit Cards वर १५०० रुपयाची अतिरिक्त सूट दिली जात आहे. याप्रमाणे एकूण डिस्काउंट ३५०० रुपयाचा होत आहे. Oppo F17 Pro चे फीचर्स Oppo F17 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 2400X1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे स्टोरेज सोबत MediaTek Helio P95 प्रोसेसर मिळतो. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित ColorOS 7.2 वर चालतो. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन मॅट गोल्ड, मॅट ब्लॅक, मॅजिक ब्लू आणि मॅटेलिक व्हाइट या ४ कलर ऑप्शन मध्ये येतो. फोनमध्ये एकूण ६ कॅमेरे दिले आहेत. याच्या रियर मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी याद दोन फ्रंट कॅमेरे दिले आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स मिळतो. ओप्पो एफ १७ प्रो मध्ये 4,000 mAh ची बॅटरी दिली आहे जी 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hObWDX