Full Width(True/False)

४ कॅमेराचा स्वस्त फोन Oppo A16 चा आज सेल, असे असतील फीचर्स

नवी दिल्लीः फोन मेकर कंपनी ओप्पो भारतीय बाजारात आपला नवीन बजेट डिव्हाइस लाँच करीत आहे. हा स्मार्टफोन असेल. कंपनीने अद्याप फोनची घोषणा केली नाही. परंतु, या फोनची विक्री २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या फोनला आजच लाँच केले जावू शकते. लाँच आधीच स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिडया वर लिस्ट झाला आहे. यावरून फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. या फोनमध्ये ५.५२ इंचाचा डिस्प्ले, वॉटरड्रॉप नॉच, ५०० एमएएचची बॅटरी आणि एआय ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. याच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा मिळू शकतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, या फोनची किंमत १३ हजार ९९० रुपये असू शकते. कंपनी ७५० रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट सुद्धा ऑफर करणार आहे. हँडसेटला तीन रंगात पर्ल ब्लू, स्पेस सिल्वर आणि क्रिस्टल ब्लॅक मध्ये आणण्याची शक्यता आहे. Oppo A16 चे संभावित स्पेसिफिकेशंस हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच करण्यात आला आहे. इंडोनेशियन मॉडल मध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्यात सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच दिली आहे. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट आणि 720x1600 पिक्सल रिजोल्यूशन सोबत येतो. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला जावू शकतो. हे ऑप्टिमाइज्ड नाइट चार्जिंग, स्मार्ट टेम्परेचर कंट्रोल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. याच्या रियर कॅमेरात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. जी 10W चार्जिंग सपोर्ट करणार आहे. फोन अँड्रॉयड ११ वर आधारित ओप्पो ColorOS 11.1 वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Zf2q6g