Full Width(True/False)

कमी किंमतीत जास्त फायदे! एअरटेलच्या ११९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळतायत अनेक बेनिफिट्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान सादर करतात. , आणि वीआयने गेल्या काही दिवासत अनेक नवीन प्लान सादर केले आहेत. याच प्रकारे एअरटेलने ११९ रुपयांचा सादर केला आहे. या प्लानमध्ये अनेक फायदे मिळतात. वाचा: चा ११९ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये एकूण १५ जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये अ‍ॅप, Hoichoi, ManoramaMax आणि चा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. प्लानची वैधता तुमच्या सध्या सुरू असलेल्या प्लानच्या वैधतेऐवढीच आहे. डेटा समाप्त झाल्यानंतर प्रती एमबीसाठी ५० पैसे आकारले जातील. १५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे प्लान्स - एअरटेलचा ४९ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये एकूण १०० एमबी डेटा मिळतो. वॉइस कॉलिंगसाठी ३८.५२ रुपये टॉकटाइम मिळतो. प्लानची वैधता २८ दिवस असून, यात कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रती मिनिटं या दराने शुल्क आकारले जाते. एअरटेलचा ७९ रुपयांचा प्रीपेड प्लान ७९ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २०० एमबी डेटा मिळतो. वॉइस कॉलिंगसाठी यात ६४ रुपये टॉकटाइम मिळतो. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कॉलिंगसाठी १ पैसे प्रती मिनिटं या दराने शुल्क आकारले जाते. एअरटेलचा १२८ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये यूजर्सला कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्स मिळत नाही. प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात कॉलिंगसाठी प्रती मिनिटं २.५ पैसे शुल्क घेतले जाते. या प्लानचा वापर केवळ वैधता वाढवण्यासाठी होतो. एअरटेलचा ४८ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा मिळतो. इतर फायदे तुमच्या सध्या सुरू असलेल्या प्लानप्रमाणेच आहेत. वैधता देखील तुमच्या सध्याच्या प्लानएवढीच आहे. डेटा समाप्त झाल्यानंतर ५० पैसे प्रती एमबी चार्ज लागतो. एअरटेलचा ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान ९८ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १२ जीबी डेटा मिळतो. अन्य फायदे तुमच्या सध्या सुरू असलेल्या प्लानप्रमाणेच आहेत. वैधता देखील तुमच्या सध्याच्या प्लानएवढीच आहे. डेटा समाप्त झाल्यानंतर ५० पैसे प्रती एमबी चार्ज लागतो. एअरटेलचा ७८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये एकूण ५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय Wynk Music चे सबस्क्रिप्शन मिळते. प्लानची वैधता तुमच्या सध्याच्या प्लानएवढीच आहे. डेटा समाप्त झाल्यानंतर ५० पैसे प्रती एमबी चार्ज लागेल. एअरटेलचा ८९ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. तसेच, Amazon Prime, Wynk Music Access आणि Free Hello Tunes चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. प्लानची वैधता तुमच्या सध्याच्या प्लानएवढीच आहे. डेटा समाप्त झाल्यानंतर ५० पैसे प्रती एमबी चार्ज लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hQXR8z