मुंबई- नेटफ्लिक्सवरील बहुप्रतीक्षित वेबसीरिज '' चा पाचवा सीजन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजच्या पाचव्या सीजनचे पहिले पाच एपिसोड ३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले. तर आणखी पाच एपिसोड ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित केले जाणार आहेत. हॉलिवूड प्रेक्षकांप्रमाणे 'मनी हाइस्ट' ची बॉलिवूड प्रेक्षकांनाही उत्सुकता होती. प्रेक्षक या सीजनची आतुरतेने वाट पाहत होते. प्रदर्शनानंतर 'मनी हाइस्ट' सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. परंतु, यावेळेस त्याचं कारण अगदी निराळं आहे. 'मनी हाइस्ट' च्या पाचव्या सीजनमध्ये प्रेक्षकांना चक्क आणि दिसले आहेत. या सीजनमध्ये अनेक जुने कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सोबतच काही नवीन चेहरेही दाखवण्यात आले आहेत. याच नवीन चेहऱ्यांमधील एक अभिनेता हुबेहूब बॉबी आणि विराट प्रमाणे दिसत असल्याने प्रेक्षकांनी सोशल मीडियावर धम्माल मीम्स वायरल केले आहेत. पुन्हा एकदा लॉर्ड बॉबी प्रेक्षकांच्या भेटीला आले म्हणत नेटकऱ्यांनी हे मीम्स शेअर केले आहेत. 'मनी हाइस्ट' चे चाहते हे मीम्स पाहून पोट धरून हसत आहेत. या सीजनमध्ये दाखवण्यात आलेल्या नव्या चेहऱ्यांपैकी एक पोलीस ऑफिसर बॉबी आणि विराट प्रमाणे दिसत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हे मीम्स शेअर करत एका नेटकऱ्याने लिहिलं, 'पाहा मनी हाइस्टमध्ये विराट कोहली देखील काम करत आहे.' तर दुसऱ्या युझरने एक मीम शेअर करत लिहिलं, 'हा तर विराट कोहली आणि बॉबी देओल यांचा मुलगा दिसत आहे.' आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, मनी हाइस्टमध्ये विराट कोहली आहे आणि कुणी पाहिलं देखील नाही?' 'मनी हाइस्ट' चे चार सीजन यापूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रदर्शित झालेल्या प्रत्येक सीजनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. याही सीजनला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yMrair