मुंबई: आरोपीविरोधातील आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानेही मंगळवारी अश्लील चित्रपटांच्या प्रकरणातील आरोपी अभिनेत्री उर्फ गेहना वशिष्ठला अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी मोठा कट रचून नवोदित कलाकारांना अश्लील कृती करण्यास भाग पाडल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे नमूद करत न्या. संदीप शिंदे यांनी गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अश्लील चित्रपटांच्या प्रकरणात पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले आहेत. फेब्रुवारी महिन्यात नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणात गेहनाला पूर्वी अटक झाली होती आणि जवळपास चार महिन्यांनंतर तिची जामिनावर सुटका झाली होती. या प्रकरणात व्यावसायिक तथा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि कुंद्राच्या कंपनीतील आयटी प्रमुख रायन थॉर्प हे १९ जुलैपासून तुरुंगात आहेत. अश्लील चित्रपटात काम करण्यास भाग पाडण्यात आलेल्या एका पीडितेच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेल्या एफआयआरमुळे अटकेची भीती असल्याने गेहनाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, आरोप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत न्यायाधीश सोनाली अगरवाल यांनी तो अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गेहनाने अॅड. अभिषेक येंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ‘पोलिसांनी यापूर्वी मला अटक केली होती आणि माझ्याकडील सर्व उपकरणे व पुरावे त्यांनी गोळा केले आहेत. त्यामुळे पुन्हा अटकेची आवश्यकता नाही. तक्रारदार महिला स्वत:च काम करण्यासाठी आली होती. तिला कोणतीही सक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याबद्दल पोलिसांनी नंतर भारतीय दंड संहितेचे कलम ३७० लावणे चुकीचे आहे’, असे म्हणणे गेहनातर्फे अर्जात मांडण्यात आले होते. मात्र, न्या. शिंदे यांनी तिचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l4JXR7