नवी दिल्ली : आणि Mi NoteBook Pro पुन्हा एकदा सेलसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये ११ th जनरेशन इंटेल कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइस एकमेव ग्रे रंगात येते. हे विंडोज १० वर काम करतो व Windows ११ मध्ये अपग्रेड करू शकता. Mi NoteBook Ultra आणि च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro ची किंमत आणि ऑफर्स: Mi NoteBook Ultra आणि Mi NoteBook Pro लॅपटॉप्स आजपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिव्हाइसला कंपनीची अधिकृत वेबसाइट Mi.com, आणि मधून खरेदी करू शकता. Mi NoteBook Ultra ची किंमत ५९,९९९ रुपयांपासून सुरू होते. डिव्हाइस कोर आय५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅमसह येते. तर कोर आय५ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ६३,९९९ रुपये आहे. कोर आय७ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ७६,९९९ रुपये आहे. Mi NoteBook Pro च्या किंमतीबद्दल सांगायचे तर याच्या कोर आय५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५६,९९९ रुपये आहे. कोर आय५ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये आहे. तर कोर आय७ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आहे. Amazon वरुन या डिव्हाइसला खरेदी केल्यास एचडीएफसी बँक क्रेडिट, डेबिट आणि ईएमआय ट्रांझॅक्शनवर ४,५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर एमआय वरून खरेदी केल्यास ७५० रुपयांचे Play-and-Win कूपन मिळेल. Mi NoteBook Ultra चे फीचर्स: नोटबुक विंडोज १० वर काम करतो. यामध्ये १५.६ इंच Mi-Truelife+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन ३२००x२००० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो १६:९ आहे. यात ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला आहे. डिव्हाइस TUV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येते. यात Intel Core i७-११३७०H CPU मिळेल. यात Intel Iris Xe आणि १६ जीबीपर्यंत DDR४ रॅम देण्यात आले आहे. सोबतच, ५१२ जीबी NVMe SSD स्टोरेज दिले आहे. यात वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५.१, थंडरबोल्ट ४ पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील. यात दोन २ वॉट स्पीकरसह डीटीएस ऑडिओ प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच, बॅकलिट कीबोर्डमध्ये तीन लेव्हल ब्राइटनेस देण्यात आली आहे. यामध्ये ७०Whr बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी १२ तास टिकेल. Mi NoteBook Pro चे फीचर्स: हा लॅपटॉप विंडोज १० वर काम करतो. यामध्ये १४ इंचाचा २.५के डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन २५६०x१६०० आहे. याचा आस्पेक्ट रेशियो १६:१० आहे. लॅपटॉप TUV Rheinland लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. यात ११th जनरेशन Intel Core i७ देण्यात आले आहे. सोबतच, Intel Iris Xe आणि १६ जीबीपर्यंत DDR४ रॅम दिली आहे. यात ५१२ जीबी NVMe SSD स्टोरेज मिळेल. लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५.१, थंडरबोल्ट ४ पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी टाइप-सी पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतील. यात ५६ Whr बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी ११ तास टिकेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BW10vy