संपदा जोशी ० 'चेहरे' या सिनेमाविषयी आणि तुझ्या व्यक्तिरेखेविषयी सांग.- कायदेक्षेत्रातील नावाजलेल्या चार मित्रांची ही गोष्ट आहे. ते सगळे मिळून घरातच कोर्ट तयार करून माझ्यावर आरोप लावतात आणि केस सुरू करतात. त्यात मी कसा अडकत जातो अशी त्याची गोष्ट आहे. 'प्रत्येक यशस्वी माणसानं यश मिळवण्यासाठी काहीतरी चूक किंवा गुन्हा नक्की केला असणार', या मताचे ते सगळे असतात. मी त्यांच्या घरी पाहुणा म्हणून गेल्यावर ते माझ्याकडेही त्याच नजरेने बघत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. ते विरूद्ध मी असा सामना सिनेमात रंगला आहे. ० महानायक यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?- अनुभव फारच भन्नाट होता. अमितजी खूप शिस्तप्रिय आहेत. अतिशय उत्साहानं, जिद्दीनं कोणतीही भूमिका ते अगदी सहज साकारतात. त्यांचा अभिनयाचा अनुभव दांडगा आहे. मी स्वतःला अजूनही नवखा अभिनेताच मानतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं, अभिनय करताना सल्ले मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ० महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी तुझा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना काय सांगशील?- 'चेहरे' हा चित्रपट जितके दिवस सिनेमागृहांत आहे तोवर महाराष्ट्रातील सिनेममागृहंही खुली होतील अशी मी आशा करतो. पण असं झालं नाही तरीही त्यांनी निराश होऊ नये. काही दिवसांनी चित्रपट ओटीटीवरही (ओव्हर द टॉप) येणार आहे. ० तू ओटीटीवर काम केलंस. तुझा अनुभव कसा होता?- एखादी वेब सीरिज करताना सगळ्याच गोष्टींना खूप वेळ लागतो. चित्रीकरण जास्त दिवस असतं, भाग जास्त असतात. त्यामुळे दोन चित्रपटांचा वेळ एका सीरिजसाठी द्यावा लागतो. असं असलं तरी या माध्यमासाठी काम करताना वेगळा माहोल असतो. ० चित्रपट निवडण्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहेस, असं का?- मी पैशांसाठी चित्रपट करत नाही. मला एखादी संहिता चांगली आणि वेगळी वाटली तेव्हाच मी ती भूमिका स्वीकारते. चित्रपट करताना दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार अशा अनेक गोष्टी चांगल्या असाव्या असं मला वाटतं. हे सगळं एकत्रं जुळून यायला वेळ लागतो. ० तुझ्यावर चित्रित झालेलं प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या लक्षात राहतं आणि त्यांना आवडतं, हे बघून कसं वाटतं?- ही आनंद आणि समाधान देणारी गोष्ट आहे. पहिल्या चित्रपटापासूनच माझ्या वाट्याला उत्तम गाणी आली आहेत. भविष्यातही माझ्यावर चांगली गाणी चित्रित होतील अशी आशा आहे. ० ट्रोलिंगबाबत तुझं मत काय? - मी ट्रोलर्सचे मेसेजेस फार बघत नाही. ज्यांच्याकडे खूप रिकामा वेळ आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात समस्या आहेत असे लोक कलाकारांना ट्रोल करतात. त्यांना तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कसे आहात हे माहिती नसतं. ते फक्तं तुम्हाला तुमच्या भूमिका बघून ट्रोल करतात. मी कलाकारांना इतकंच सांगू इच्छितो की, 'ट्रोलिंगला अजिबात मनावर घेऊ नका. मीही त्याकडे लक्ष देत नाही. आपण चांगलं काम करत राहू.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38UbsXI