Full Width(True/False)

रोलेबल स्क्रीनसह Hisense Rollable Screen Laser TV लाँच, आता घरीच मिळणार थिएटर-ऑपेरा हाऊसचा अनुभव

नवी दिल्ली: ने जगातील पहिला लाँच केला आहे. चिनी कंपनी टीव्ही बनवण्यासाठी ओळखली जाते. Hisense ने ग्लोबल लेझर डिस्प्ले टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट फोरममध्ये लाँचची घोषणा केली. यावेळी Hisense ग्रुप होल्डिंग कंपनीचे उपाध्यक्ष यू झिताओ म्हणाले, “लेझर डिस्प्ले हा प्रत्यक्षात स्पेस सोल्यूशन्सचा एक संच असून जगातील पहिला रोल करण्यायोग्य स्क्रीन लेसर टीव्ही ही फक्त सुरुवात आहे. वाचा: Hisense Rollable Screen Laser TV मध्ये मोठी ७७ इंच रोलेबल स्क्रीन आहे. हा टीव्ही 4K अल्ट्रा-हाय HDR रिझोल्यूशनला सपोर्ट करत असून डिस्प्ले ३५० निट्स पीक ब्राइटनेस देते. स्क्रीनच्या काठावर वर्चुअली बेझल दिसणार नाही. तर टीव्हीच्या वरच्या आणि खालच्या काठावर बेझल आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत हायसेन्सने या कर्लिंग स्क्रीन लेसर टीव्हीशी संबंधित ७० हून अधिक पेटंटसाठी अर्ज केला आहे. थिएटरसारखा ऑडिओ अनुभव देण्यासाठी या टीव्हीमध्ये ट्रान्सव्हिजन व्हिज्युअल इंजिन आणि हार्मोन कार्डन स्पीकर्स आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, जेव्हा स्क्रीन रोलआउट केली जाते, तेव्हा ग्राहकांना थिएटरसारखा अनुभव मिळतो आणि जेव्हा तो खाली आणला जातो, तेव्हा युजर्सना ऑपेरा हाऊससारखा अनुभव मिळतो. हायसेन्सचा हा नवीन टीव्ही बनवण्यासाठी एव्हिएशन-ग्रेड हाय-टेक मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हा टीव्ही एकाच वेळी कर्लिंग टीव्ही आणि फ्लॅट स्क्रीन या दोन्ही गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. थिएटर-ग्रेड ऑडिओ अनुभव देण्यासाठी, हरमन कार्डन गोल्डन इअर टीम डॉल्बी साउंड इफेक्ट्स (डीटीएस ड्युअल डिकोडिंग) चे समर्थन करते. हायसेन्स रोलेबल स्क्रीन लेझर टीव्ही जेडी डॉट कॉम वर खरेदीसाठी आता उपलब्ध आहे. परंतु, आजपर्यंत कंपनीने त्याची किंमत आणि उपलब्धता उघड केलेली नाही. कंपनी ग्राहकांना फक्त १ युआनमध्ये टीव्ही बुक करण्याची संधी देत आहे. कंपनीच्या आधीच्या उत्पादनांची लाँचिंग पाहता, या डिव्हाइसची विक्री या वर्षी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VRA9RY