नवी दिल्लीः भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने दोन सर्कल मध्ये युजर्संना जोरदार झटका दिला आहे. कंपनी आता या सर्कलमध्ये युजर्संना आधीपेक्षा कमी डेटा ऑफर करीत आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीने यासाठी कोणतीही अधिकृत नोटीस जारी केली नाही. परंतु, बदल या साइटवर दिसत आहे. हे बेनिफिट डबल डेटाचा आहे. कंपनी आता आपल्या तीन प्लान्ससाठी डबल डेटा ऑफर करीत नाही. जाणून घ्या डिटेल्स. वोडाफोन आयडियाने या प्लान्सवर बंद केले हे फायदे वोडाफोन आयडिया आंध्र प्रदेश आणि तेलंगानात तीन डबल डेटा प्लान आणला होता. हे प्लान २९९ रुपये, ४४९ रुपये, आणि ६९९ रुपयाचे होते. या प्लानमध्ये आधी रोज ४ जीबी डेटा मिळत होता परंतु, आता याऐवजी फक्त २ जीबी डेटा मिळणार आहे. हे बदल आधीच लागू झाले आहेत आता वोडाफोन आयडियाच्या वेबसाइटवर पाहायला मिळू शकतात. याशिवाय, या सर्व प्लान्स मध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत होती. या तिन्ही प्लान्स सोबत फ्री ओव्हर द टॉप ओटीटी प्लान्स सोबत युजर्संना झी ५ प्रीमियम आणि व्हीआय मूव्हीज आणि टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. कंपनीकडून विकेंड डेटा रोलओवर आणि बिंज ऑल नाइट बेनिफिट मिळत राहतील. यासंबंधी कोणतीही निश्चितता नाही. कंपनी अन्य दोन सर्कलमध्ये लवकरच डबल डेटाला हटवणार आहे. परंतु, आता हे बदल तेलगांना आणि आंध्र प्रदेशमधील युजर्संसाठी आहेत. हे बदल टॅरिफ वाढीसाठी होऊ शकतात. या प्लान्समध्ये कमी डेटा मिळणाऱ्या युजर्संना कंपनीकडून जास्त ४ जीबी डेटा व्हाउचर खरेदी करावे लागू शकते. या प्लान्समुळे कंपनीला उत्पन्न मिळू शकते. या तिन्ही प्लान सोबत दिले जाणारे झी ५ प्रीमियम बेनिफिट १ वर्षासाठी आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tytsR5