Full Width(True/False)

कंगनाच्या 'थलाइवी'ची जादू पडली फिकी; पहिल्या तीन दिवसांत झाली फक्त इतकी कमाई

मुंबई : अभिनेत्री हिचा महत्त्वाकांक्षी सिनेमा 'थलाइवी' १० सप्टेंबर रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाला. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे या सिनेमाला ही घवघवीत यश मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता कंगनाचा हा सिनेमा प्रेक्षकांवर फारसा प्रभाव टाकू शकलेला नाही, असेच म्हणावे लागेल. कारण पहिल्या तीन दिवसांत या सिनेमाची कमाई पाच कोटींचा आकड देखील गाठू शकलेली नाही. महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहे सुरू नाहीत, त्यामुळे हा सिनेमा येथे प्रदर्शित होऊ शकला नाही. तरी या सिनेमाची हिंदी रिमेक जिथे प्रदर्शित झाला तिथे या सिनेमाने एक कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या दिवशी थलाइवाच्या हिंदी रिमेकची कमाई २५ लाख रुपये, दुस-या दिवशी ३० लाख रुपये आणि तिस-या दिवशी ४५ लाख रुपये झाली आहे. तर 'थलाइवा'च्या आधी प्रदर्शित झालेल्या 'बेल बॉटम' सिनेमाने पहिल्याच दिवशी संपूर्ण देशामध्ये १५ कोटी रुपये कमावले होते. तमिळमध्ये प्रदर्शित झालेल्या'थलाइवी'ने बॉक्स ऑफिसवर त्यातल्या त्यात बरी कमाई केली आहे. तमिळनाडूमध्ये या सिनेमाने २.७५ कोटी रुपये कमावले आहेत. तर बंगळुरू आणि अन्य शहरांमधून ५० लाखांची कमाई बॉक्स ऑफिसवर झाली आहे. कंगनाचा 'थलाइवी' सिनेमाला तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. 'लबाम' या सिनेमाने पहिल्या चार दिवसांत चार कोटी रुपये कमावले तर कंगनाच्या 'थलाइवी'ने तीन दिवसांत केवळ एक कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार 'थलाइवी' थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच सॅटेलाईट रॉयल्टी, डिजीटल रॉयल्टी आणि संगीत रॉयल्टीमधून ८५ कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ljY852