नवी दिल्ली : आजकाल १०,००० रुपयांच्या बजेटमध्ये शक्तिशाली चिपसेट, ड्युअल रिअर कॅमेरे, फिंगरप्रिंट सेन्सर आणि मोठी बॅटरी असलेला बजेट स्मार्टफोन खरेदी करणे फ फार कठीण नाही. जर तुम्हाला या रेंजमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर ही लिस्ट नक्की पाहा. या सर्वच फोनची फीचर्स एकापेक्षा एक असून हे मॉडर्न स्मार्टफोन्स तुम्हाला नक्कीच आवडतील. पाहा डिटेल्स. वाचा: : फोनची किंमत ९,४९९ रुपये आहे. यात ६.८२ इंच HD + डिस्प्ले आहे. फोनमध्ये ४८MP + २MP + AI लेन्स रिअर कॅमेरा आणि ८ MP फ्रंट कॅमेरा आहे. Infinix Hot 10Sमध्ये MediaTek Helio G८५ प्रोसेसरसह ४GB RAM + ६४GB स्टोरेज पर्याय असून याची बॅटरी ६००० mAh आहे. : फोनची किंमत ९,८९५ रुपये असून फोन ६.५२ इंचाच्या डिस्प्लेसह येतो. यात ४८ MP रियर आणि८MP फ्रंट कॅमेरा आहे. फोन ४GB रॅम + ६४GB स्टोरेज सह येतो. फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी आहे. : फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. यात ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज पर्याय आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० SoC द्वारे समर्थित, या स्मार्टफोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी आहे. हे Android ११ वर चालते. Moto E7 Plus : देखील एक परवडणारा फोन आहे. त्याची किंमत ९,४९९ रुपये आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसरद्वारे समर्थित, हा स्मार्टफोन ४ GB रॅमसह येतो. फोन ५,००० mAh ची बॅटरी पॅक करतो. Redmi 9 Prime : मीडियाटेक हेलियो जी ८० एसओसी प्रोसेसरद्वारे समर्थित, Redmi 9 Prime फोन ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजच्या दोन प्रकारांमध्ये येतो. यात ४ GB ची रॅम आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्याची किंमत ९४९९ रुपये आहे. Realme Narzo 30A : सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये आहे. यात चौरस आकाराचे कॅमेरा मॉड्यूल आहे. MediaTek Helio G85 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित, या फोनचे दोन प्रकार आहेत. ज्यात, पहिला ३GB + ३२GB स्टोरेज आणि दुसरा ४GB + ६४ GB स्टोरेज पर्यायात येतो. Realme Narzo 10A: फोनचे ३ GB+३२ GB स्टोरेज व्हेरिएंट ८,९९९ रुपये आणि ४GB+६४GB स्टोरेज व्हेरिएंट ९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात MediaTek Helio G70 SoC प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BVB9E4