Full Width(True/False)

Money Laundering Case: जॅकलिनची पुन्हा झाली ईडी चौकशी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात 'ईडी' ने काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री हिची चौकशी केली होती. जॅकलिनची ईडीच्या दिल्ली कार्यालयात तब्बल ४ तास चौकशी झाली. त्यानंतर तिचा जबाबही नोंदवण्यात आला. जॅकलिनचा हा जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आला. तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटींहून अधिक आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याच प्रकरणी जॅकलिनची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी तिला २५ सप्टेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे. नोरा फतेहीची होणार चौकशी सुकेश चंद्रशेखरने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी याआधीही जॅकलिनची चौकशी झाली होती. याचप्रकरणी ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीची देखील जबाब नोंदवला होता. याप्रकरणी नोराचीही पुन्हा ईडी चौकशी करणार आहे. याप्रकरणी नोराचे नाव पहिल्यांदाच समोर आले आहे. सुकेश चंद्रशेखर याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गुन्हा याआधीच नोंदवण्यात आला आहे. तिहार तुरुंगात असलेल्या सुकेशने एका व्यावसायिकाकडून वर्षभरात २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच सुकेशने तुरुंगातूनच व्यावसायिकाच्या पत्नीकडून ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. सुकेशने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन ही प्रमुख साक्षीदार झाली आहे. त्यामुळे ईडीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. दरम्यान, सुकेश चंद्रशेखर याच्यावर याआधीही आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. त्याने लीनासोबत २०१३ मध्ये कॅनरा बँकेतही आर्थिक गैरव्यहार केला होता. याप्रकरणी या दोघांना मुंबई पोलिसांनी २०१५ मध्ये अटक केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EorBU3