Full Width(True/False)

जिओचा शानदार प्लान, अनलिमिटेड डेटा-कॉलिंगसह मिळेल १५ ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन; किंमत फक्त...

नवी दिल्ली : कडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लान्स उपलब्ध आहे. यातील सर्वात लोकप्रिय प्लान ९९९ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओच्या ९९९ रुपयांच्या या लोकप्रिय फायबर प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: ९९९ रुपयांचा फायबर प्लान या प्लानची वैधता ३० दिवस असून, यामध्ये १५० एमबीपीएस स्पीडने डेटा मिळतो. म्हणजे ग्राहक १५० एमबीपीएस अपलोड आणि १५० एमबीपीस डाउनलोड स्पीडचा फायदा घेऊ शकतात. विशेष म्हणजे यात अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. जिओफायबरच्या या प्लानमध्ये तब्बल १५ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. यामध्ये , डिज्नी+ हॉटस्टार, वूट सिलेक्ट, सोनी लिव्ह, झी5, वूट किड्स, सन नेक्स्ट HoiChoi, Lionagate Play, Discovery+, , Shemaroome, Eros Now, ALTBalaji, JioSaavn सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. जिओफायबरच्या ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना १ वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हीडिओचे सबस्क्रिप्शन मिळते. प्लानमध्ये जीएसटी शुल्क अतिरिक्त द्यावे लागेल. रिलायन्स जिओकडे या व्यतिरिक्त जिओफायबर ग्राहकांसाठी ६९९ रुपये, ३९९ रुपये, १,४९९ रुपये, २,४९९ रुपये, ३,९९९ रुपये आणि ८,४९९ रुपये किंमतीचे प्लान्स आहे. या सर्व प्लान्समध्ये वेगवेगळ्या स्पीडने अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ao06aI