Full Width(True/False)

Motorola ने गुपचूपपणे लाँच केला कमी किंमतीचा स्मार्टफोन, मोठ्या बॅटरीसोबत दमदार कॅमेरा

नवी दिल्लीः Motorola ने गुपचूपणे आपला स्मार्टफोन लॅटिन अमेरिका, यूरोप आणि मिडल ईस्ट मध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ गो एडिशन ओएसवर चालतो. स्मार्टफोनची किंमत ब्राझीलमध्ये १३ हजार ९९७ रुपये आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोचनी किंमत आहे. हा फोन लॅटिन अमेरिकेत दोन कलर ऑप्शन ब्लॅक आणि ग्रीन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. आतापर्यंत लॅटिन अमेरिका बाहेर अन्य बाजारात स्मार्टफोन लाँच होणार की नाही, यासंबंधी माहिती समोर आली नाही. Moto E20 चे स्पेसिफिकेशन्स मोटोरोला मोटो ई २० मध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले दिला आहे. हा एक ड्यु ड्रॉप नॉच पॅनल आहे. याचा रिझॉल्यूशन एचडी प्लस (1600 x 720 पिक्सल) आहे. IPS स्क्रीन मध्ये २०.९ आस्पेक्ट रेशियो आणि स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट दिला आहे. Moto E20 चा कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा सिस्टम आहे. मागील बाजुस व्हर्टिकली ठेवण्यात आले आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग यूनिट दिले आहे. कॅमेरा लेन्स बरोबर खाली एलईडी फ्लॅश दिले आहे. फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा दिला आहे. Moto E20 ची बॅटरी आणि अन्य फीचर्स हे UNISOC T606 चिपसेट कडून करण्यात आले आहे. जे 1.6GHz वर क्लॉक करण्यात आले आहे. याला २ जीबी रॅम आणि ३२ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज सोबत जोडले आहे. हे एक अँड्रॉयड ११ गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टमवर बूट होते. यात मोटोरोलाचे काही प्री इंस्टॉल अॅप दिले आहेत. यात 4,000mAh ची बॅटरी दिली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. ड्युअल सिम फोन ४ जी कनेक्टिविटीला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ejpd0B