नवी दिल्ली: Apple इव्हेंटमध्ये काल लाँच करण्यात आला. iPhone 13 ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. तर, मिनी आवृत्तीची किंमत ६९,९०० रुपयांपासून सुरू होते. भारतात iPhone 13 Pro ची किंमत ११९,९०० रुपये आहे. तर, iPhone 13 Pro Max ची किंमत १२९,९०० रुपयांपासून सुरू होते. पण, आता iPhone 13 स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. यासाठी अॅपल ट्रेडिंगची संधी देत आहे. Apple ट्रेडिंगमधून iPhone 13 खरेदी करत असल्यास त्यावर तुम्हाला मोठी सूट मिळू शकते. वाचा: ट्रेडिंगसह, तुम्ही नवीन iPhone सह पात्र डिव्हाइस एक्स्चेंज करू शकता. यासह, जुन्या डिव्हाइसवर त्वरित क्रेडिट दिले जाणार असून यासाठी तुम्हाला फोनशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. यामध्ये तुम्हाला ब्रँड नेम, मॉडेल आणि कंडिशन बद्दल सांगावे लागेल. यानंतर कंपनीतर्फे तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची किंमत सांगण्यात येईल. आणि नवीन आयफोन तुमच्या घरी पोहोचवला जाईल. म्हणजेच, कंपनी जुना Phone घेऊन ई-कॉमर्स साइटच्या एक्सचेंज ऑफरसारखे काम करेल. या ट्रेडिंगमध्ये, तुम्ही सर्व फोन एक्सचेंज करू शकत नाही. कंपनीला दिलेल्या यादीनुसार, iPhone SE (1st Generation) आणि वरील सर्व मॉडेल्सच यात एक्स्चेंज करता येतील. लिस्टनुसार, Pro Max चे एक्सचेंज मूल्य ४६,१२० रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. या एक्सचेंजमध्ये इतर स्मार्टफोनवर देखील ऑफर आहेत . Samsung चे प्रीमियम फोन आणि OnePlus चे प्रीमियम फोन एक्सचेंज करून तुम्ही नवीन iphone देखील मिळवू शकता. तुम्ही OnePlus 6T ते OnePlus 8 Pro मध्ये एक्स्चेंज करू शकता. OnePlus 8 pro चे एक्सचेंज मूल्य १९,२९५ आहे. Samsung Galaxy S 20 प्लस एक्सचेंज करताना तुम्हाला १३,०८५ रुपयांपर्यंत सूट मिळेल. Samsung galaxy A 50 देखील तुम्ही एक्सचेंज करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EgjRTY