Full Width(True/False)

५० MP कॅमेरासह Infinix Hot 11S आज मार्केटमध्ये करणार एन्ट्री, बजेट किमतीत होऊ शकतो लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन आज भारतीय बाजारात लाँच होणार असून हा फोन अनेक खास वैशिष्ट्यांसह सादर केला जाईल. हे डिव्हाइस ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लिस्ट केले गेले आहे. या फोनमध्ये तेच प्रोसेसर देण्यात आले आहे जे Redmi Prime 10 स्मार्टफोनमध्ये दिले आहे. फोनची किंमत १५,००० रुपये असू शकते. असेही सांगण्यात येत आहे. तसेच, ५० मेगापिक्सलचा सेन्सर आणि मीडियाटेक हेलियो A20 प्रोसेसर आणि ६ जीबी पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. पाहा डिटेल्स. वाचा: Infinix Hot 11S ची वैशिष्ट्ये: फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार फोनमध्ये मीडियाटेक हेलियो जी ८८ प्रोसेसर देण्यात येणार आहे. तसेच, ६.७८ इंच FHD + डिस्प्ले दिला जाईल. त्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. तसेच, फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, हे डिव्हाइस Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तसेच ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले जाईल. Infinix Hot 11S मध्ये १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. फोन १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल . तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी, त्यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. फोनची किंमत सुमारे १५,००० रुपये असू शकते. Redmi 10 Prime ला टक्कर Infinix Hot 11S ची भारतीय बाजारात Redmi 10 Prime सोबत स्पर्धा होईल. या फोनमध्ये देखील MediaTek Helio G८८ प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. तसेच, यात ६.५ इंच FHD + डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा प्राथमिक सेन्सर ५० मेगापिक्सेलचा असेल. दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. २ मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. चौथा २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर सपोर्ट आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे डिव्हाइस Android 11 आणि MIUI 5 वर काम करते. फोनला ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी, १० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CkwRGu