मुंबई- '' मध्ये टप्पूची भूमिका साकारणारा जेव्हा 'बबिता जी' अर्थात च्या फोटोंवर आणि व्हिडिओंवर कमेन्ट करायचा तेव्हा त्या दोघांमध्ये काही तरी सुरू असल्याचा संशय चाहत्यांना आलेला. ईटाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुनमुन दत्ता आणि राज अनादकट एकमेकांच्या आकंठ प्रेमात आहेत आणि ते डेट करत आहेत. रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर प्रत्येकाला हे माहीत आहे की मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्यात काहीतरी सुरू आहे. मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, दोघांच्या कुटुंबीयांनाही याबद्दल माहिती आहे. स्त्रोत पुढे म्हणाला की त्यांची लव्हस्टोरी बरीच जुनी आहे. दोघेही त्यांच्या नात्याचा खूप आदर करतात. सेटवर कोणीही मुनमुन आणि राज यांना त्यांच्या नात्याबद्दल चिडवत नाही. सूत्राने पुढे सांगितले की मुनमुन आणि राज यांच्या लव्हस्टोरीबद्दल अजूनपर्यंत कोणाला कसं कळलं नाही याचचं आश्चर्य वाटतं. राज २४ वर्षांचा आहे तर मुनमुन ३३ वर्षांची आहे. त्यानुसार, दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक आहे. ईटाइम्सने मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण, दोघांनीही यावर कोणतेच उत्तर दिले नाही. मुनमुन दत्ता २००८ पासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' चा भाग आहेत, तर राज अनादकट २०१७ मध्ये या मालिकेचा भाग झाला. त्याने मालिकेत अभिनेता भव्या गांधीची जागा घेतली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3BZG32R