Full Width(True/False)

Realme Narzo 50 Series २४ सप्टेंबरला देणार धडक, ३ स्मार्टफोन्स होणार लाँच पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : Realme ने भारतात आपली नवीन 50 मालिका सुरू करणार असल्याचे कन्फर्म केले आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी २४ सप्टेंबर रोजी भारतात नवीन स्मार्टफोनचे अनावरण करणार आहे. Realme Narzo 50, आणि Realme Narzo 50A स्मार्टफोन आगामी मालिकेत लाँच करण्यात येणार आहे. वाचा: Narzo 50 मालिकेच्या Realme Narzo 50A मॉडेलचे वैशिष्ट्य आधीच समोर आले आहे. 91 Mobile ने दिलेल्या अहवालात Narzo 50 A चे स्पेसिफिकेशन्स आणि रेंडर लीक झाले असून Narzo 50A मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असू शकतो. या डिव्हाइसमध्ये काठावर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. हेलिओ जी ८५ चिपसेट हँडसेटमध्ये असू शकतो. हा फोन अँड्रॉइड ११ सह आणला जाईल. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि समोर ८ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी आणि ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह उपलब्ध केला जाऊ शकतो. तसेच, हे डिव्हाइस ऑक्सिजन ग्रीन आणि ऑक्सिजन ब्लू रंगात लाँच होण्याची शक्यता आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे Realme Narzo 50 मालिकेव्यतिरिक्त, कंपनी २४ सप्टेंबर रोजी भारतात Realme Band 2 लाँच करत आहे. Realme Band 2 नुकताच १३९ MYR (सुमारे२,५०० रुपये) मध्ये मलेशियात रिलीज झाला आहे. नवीन Realme Band 2 मध्ये तणाव मापन आणि रक्त-ऑक्सिजन पातळीसाठी SPO 2 सेन्सर देण्यात आले आहेत. Realme Band 2 गो च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर, यात १.४ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. ज्याचे, रिझोल्यूशन १६७ x ३२० पिक्सेल आहे. फिटनेस ट्रॅकरमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, ऑटोमॅटिक स्टेप काउंटर, वॉटर ड्रिंक रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. Band 2 मध्ये रक्त-ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी Realme ने SPO 2 सेन्सर देखील प्रदान केला आहे. Realme Band 2 ९० स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते आणि एकाच चार्जवर १२ दिवसांची बॅटरी लाईफ देते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tVCxDS