Full Width(True/False)

५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घरी आणा Realme Pad, डिव्हाइसमध्ये १०.४ इंच स्क्रीन आणि मजबूत बॅटरी,पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: नुकतेच चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने एक अल्ट्रा स्लिम, रिअल आणि जबरदस्त डिव्हाइस लाँच केले असून या डिव्हाइसचे नाव आहे. कंपनीने त्यात अनेक खास वैशिष्ट्ये दिली आहेत जी युजर्सना हमखास आवडतील. Realme Pad हा कंपनीचा पहिला Tablet आहे जो ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी ८० प्रोसेसरसह येतो. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Realme Pad आज दुपारी १२ पासून खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून यावर काही ऑफर्स देखील देण्यात येत आहे. वाचा: Realme Pad किंमत आणि ऑफर: Realme Pad चा LTE प्रकार (३GB + ३२GB) १५,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर, LTE व्हेरिएंट (४GB + ६४ GB) १७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याचे वायफाय व्हेरिएंट (३GB +३२ GB) १३,९९९ रुपयांमध्ये रिअल गोल्ड आणि रिअल ग्रे रंगात खरेदी करता येईल . फ्लिपकार्ट वरून खरेदी केल्यावर, युजर्सना फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास ५ टक्के सूट दिली जाईल. त्याचबरोबर ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट मास्टरकार्डमधून पहिल्या पेमेंटवर १० टक्के सूट दिली जाईल. मानक ईएमआय अंतर्गत, दरमहा ४८६ रुपये देऊन Realme Pad खरेदी केले जाऊ शकते. Realme Pad ची वैशिष्ट्ये: हे Android ११ वर आधारित Realme UI वर काम करते. यात १०.४ इंचाचा WUXGA+ डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन१२००x२०० आहे. त्याचे स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८२.५ टक्के आहे. यात मीडियाटेक हेलियो जी ८० प्रोसेसर असून ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. त्याचबरोबर८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून ४ डायनॅमिक स्पीकर्स आहेत जे डॉल्बी एटमॉस आणि हाय-रेस ऑडिओ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. तसेच ड्युअल मायक्रोफोन देखील यात आहेत. Realme Pad मध्ये ओपन-अप ऑटो कनेक्शन वैशिष्ट्य देखील आहे. तसेच, ७१०० mAh ची बॅटरी आहे जी १८ W क्विक चार्जिंग सपोर्टसह येते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z6Gbzv