Full Width(True/False)

Realme चा दमदार स्मार्टफोन आज होणार भारतात लाँच, मिळेल ६००० एमएएचची बॅटरी

नवी दिल्ली : चा नवीन Realme C25Y आज भारतात लाँच होणार आहे. हा फोन ६००० एमएएचची बॅटरी आणि UNISOC T६१० चिपसेटसोबत येऊ शकतो. याशिवाय फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्लेसह फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. या फोनच्या संभाव्य किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Realme C25Y चे संभाव्य फीचर रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल. या डिव्हाइसमध्ये UNISOC T६१० प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. फोन अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली जाईल. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट मिळेल. Realme C25Y ची संभाव्य कीमत स्मार्टफोनची किंमत जवळपास ९ हजार रुपये असू शकते. फोनची अधिकृत किंमत लाँचिंगनंतरच समजेल. फोनला कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. गेल्या महिन्यात लाँच झाला हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्टफोनला लाँच केले आहे. याची किंमत ३७,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.४३ इंच एफएचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आपे. फोनमध्ये Adreno ६६० GPU सह Snapdragon 888 5G प्रोसेसर आणि ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ६४ मेगापिक्सलचा सोनी IMX६८२ सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lth8hm