नवी दिल्ली: आणि भारतात गेल्या महिन्यातच लाँच करण्यात आले असून भारतात Galaxy Z Fold 3 5G ची किंमत १,४९,९९९ रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सॅमसंगच्या वेबसाइटवरून तब्बल ७,००० रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. Samsung Galaxy Z Fold 3 5G हा एस पेनला सपोर्ट करणारा कंपनीचा पहिला फोन आहे. वाचा: Samsung Galaxy Z Fold 3, Samsung Galaxy Z Flip: भारतात किंमत नवीन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ३ च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,४९,९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज पर्याय १,५७,९९९ रुपयांमध्ये येतो. हा फोन फँटम ब्लॅक आणि फँटम ग्रीन रंगात खरेदी करता येईल. एचडीएफसी बँक कार्डसह फोन ७,००० रुपयांच्या इन्स्टंट कॅशबॅक सॅमसंगच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफर अंतर्गत ७००० रुपयांचा अतिरिक्त लाभ देखील उपलब्ध आहे. याशिवाय, जीएसटी इनवॉइस मिळवताना १८ टक्के लाभ देखील मिळेल. यावर १८ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसेच, सॅमसंग शॉप अॅपवरून पहिल्या खरेदीवर अतिरिक्त २ हजार रुपयांची सूट मिळेल. Samsung Galaxy Z Fold 3: वैशिष्ट्ये Samsung Galaxy Z Fold 3 5G मध्ये ७.६ इंच प्राथमिक डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट १ २० Hz आहे. या फोनमध्ये ६.२ इंच HD + डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. Samsung Galaxy Z Fold 3 मध्ये 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि १२ GB रॅम- २५६ जीबी स्टोरेज आहे. जे, मायक्रो एसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. Samsung Galaxy Z Fold 3 5G मध्ये मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. जो, १२ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह येतो. याशिवाय १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि १२ मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. Galaxy Z Fold 3 5 मध्ये १० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोल्डिंग स्क्रीनच्या वर फोनमध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा देखील आहे. हा कॅमेरा ४ मेगापिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. फोनला पॉवर देण्यासाठी ४४०० mAh ड्युअल सेल बॅटरी आहे. जी, वायरलेस आणि वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS / A-GPS, NFC, Ultra-Wideband (UWB) आणि USB Type-C पोर्ट आहेत. फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या बाजूला उपलब्ध आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k1N4Kr