Full Width(True/False)

WhatsApp मध्ये सर्वात जबरदस्त फीचरची एन्ट्री, युजर्स याच फीचरची पाहत होते वाट

नवी दिल्लीः यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने अखेर नॉन बीटा युजर्ससाठी Multi-Device Support फीचरला रोलआउट करणे सुरू केले आहे. या फीचरला कंपनी आता पर्यंत केवळ बीटा युजर्सला ही ऑफर देत होती. या फीचरच्या मदतीने एकापेक्षा जास्त नॉन फोन डिव्हाइस सारख्या लॅपटॉप आणि कंप्यूटर वर आपला व्हाट्सअॅप अकाउंटला अॅक्सेस करू शकतील. अपडेटचे व्हर्जन नंबर 2.21.19.9 WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हाट्सअॅपच्या या लेटेस्ट अपडेटचे व्हर्जन नंबर 2.21.19.9 आहे. याला अँड्रॉयड आणि iOS च्या स्टेबल व्हर्जन यूजरसाठी रोलआउट करण्यात आले आहे. नवीन व्हर्जनने अपडेट करून युजर्स आपल्या फोनमध्ये व्हाट्सअॅप मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरची मजा घेवू शकता. WABetaInfo ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले की, व्हाट्सअॅप भविष्यात येणाऱ्या अपडेट्ससाठी मल्टी डिव्हाइस व्हर्जन अपडेट बंधनकारक करणार आहे. फोनमध्ये इंटरनेट नसल्यानंतर सुद्धा चॅटिंग करू शकाल. मल्टी डिव्हाइस फीचरला कंपनी ने जुलै मध्ये आणले होते. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे युजर स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसून सुद्धा आपल्या व्हाट्सअॅप अकाउंटला चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर अॅक्सेस करू शकते. या फीचरच्या मदतीने युजर फोन ऑफ होण्याच्या स्थितीत असेल तर लॅपटॉप किंवा कंप्यूटर वर व्हाट्सअॅप चॅटिंगची मजा घेवू शकता. व्हाट्सअॅप मध्ये असे अॅक्टिवेट करा मल्टी डिव्हाइस सपोर्ट जर तुम्ही त्या युजर्संपैकी एक असाल ज्यांच्याकडे हे लेटेस्ट अपडेट पोहोचले असेल तर खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने मल्टी डिव्हाइस बीटाला जॉइन किंवा लीव्ह करू शकता. अँड्रॉयड यूजर या स्टेप्सला करा फॉलो १. सर्वात आधी आपल्या फोनमधील व्हाट्सअॅप ओपन करा. २. वरच्या बाजुला देण्यात आलेल्या तीन डॉटच्या मेन्यूवर टॅप करा. ३. लिंक्ड डिव्हाइस ऑप्शनवर जा. ४. आता मल्टी डिव्हाइस बीटा ऑप्शनवर टॅप करा. ५. आता तुम्ही बीटा जॉइन किंवा लीव्ह करू शकता. iOS युजर असे अॅड करू शकता नवीन फीचर १. सर्वात आधी व्हाट्सअॅप ओपन करा. २. यानंतर सेटिंग्स मध्ये जा. ३. लिंक्ड डिव्हाइसवर टॅप करा. ४. या ठिकाणी दिलेल्या मल्टी डिव्हाइस बीटा ऑप्शनवर टॅप करा. ५. आता जॉइन बीटा किंवा लीव्ह बीटावर टॅप करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lqX27C