Full Width(True/False)

प्रतीक्षा संपली ! Xiaomi Pad 5 टॅब्लेट लाँच, मिळतेय मोठी सूट, पाहा तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही

नवी दिल्ली : तर्फे आयोजित एका कार्यक्रमात Pad 5 टॅब्लेट आणि लाँच करण्यात आले. आहेत. टॅब्लेट १२० Hz डिस्प्ले रिफ्रेश रेटसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५० प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि २५६ GB पर्यंत स्टोरेज ऑफर करतो. Xiaomi Pad 5 सोबत, कंपनीने स्मार्ट पेन देखील सादर केले. जे, स्क्रीनशॉट आणि स्विफ्ट शॉट्स घेण्यासाठी बटणांसह येते. वाचा: Xiaomi Pad 5 ची किंमत आणि विक्रीची तारीख: नवीन Xiaomi Pad 5 ची किंमत ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी ३४९ यूरो (अंदाजे ३०,३०० रुपये) आहे. ६ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी याची किंमत ३९९ यूरो (अंदाजे ३४,६०० रुपये) आहे. हे कॉस्मिक ग्रे आणि पर्ल व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येते. Xiaomi Pad 5 ची विक्री २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. अर्ली बर्ड किंमत अंतर्गत सध्या ६GB + १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९९ EUR (सुमारे २५,९०० रुपये) ठेवण्यात आली आहे. जे प्रथम १२ PM PST वर AliExpress द्वारे उपलब्ध होईल. तर, टॅब अॅमेझॉन, लझाडा आणि Mi.com द्वारे देखील उपलब्ध असेल. Xiaomi Pad 5 ची वैशिष्ट्ये: Xiaomi Pad 5 अँड्रॉइड ११ वर काम करतो. ज्यामध्ये पॅडसाठी MIUI १२.५ आहे आणि त्यात ११ इंच WQHD+ (१,६००x२५६० पिक्सेल) ट्रू टोन डिस्प्ले १२० Hz रिफ्रेश रेट, १६:१० आस्पेक्ट रेशियो आहे. तसेच डॉल्बी व्हिजन आणि HDR10 सपोर्ट आहे. डिव्हाइस हे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० एसओसी द्वारे समर्थित आहे, ६ जीबी रॅम मानक म्हणून. Xiaomi Pad 5 २५६ GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. टॅब्लेट फेस अनलॉकला सपोर्ट करतो आणि मल्टीटास्किंगसाठी स्प्लिट स्क्रीनला सपोर्ट करतो. फोटो आणि व्हिडिओंसाठी, Xiaomi Pad 5मध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर, एलईडी फ्लॅश आणि समोर ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा १०८० p रेकॉर्डिंगसह आहे. यात ८,७२० mAh ची बॅटरी आहे जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Xiaomi चा दावा आहे की, Pad 5 १० तास गेमिंग,१६ तास व्हिडिओ प्लेबॅक आणि ५ दिवस संगीत प्लेबॅक ऑफर करतो. याव्यतिरिक्त, टॅब्लेट चार स्पीकर्ससह येतो आणि डॉल्बी एटमॉसला देखील समर्थन देतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ v5, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे. Xiaoimi Pad 5 वर नेटफ्लिक्स अॅप पूर्व-स्थापित आहे. Xiaomi Smart Pen : Xiaomi Pad 5 अलीकडेच जाहीर केलेल्या Xiaomi Smart Pen ला समर्थन देते. हे दोन बटणांसह येते, एक जे युजर्सना जलद नोट्स घेण्यास अनुमती देते आणि दुसरे त्वरित स्क्रीनशॉटसाठी परवानगी देते. स्मार्ट पेन ४, ०९६ स्तरीय दाब संवेदनशीलतेसह येतो आणि त्याचे वजन केवळ १२.२ ग्रॅम आहे. हे जेश्चर नेव्हिगेशनला समर्थन देत असून त्यात टीपीई सॉफ्ट टिप्स आहेत ज्या बदलल्या जाऊ शकतात. झिओमी स्मार्ट पेनसाठी वायरलेस चार्जिंग बेस म्हणून चुंबकीय क्लिप-ऑन दुप्पट होते. शाओमीचा दावा आहे की पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त १८ मिनिटे लागतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kcX6rT