Full Width(True/False)

WhatsApp वर 'ही' छोटी चूक केल्यास अकाउंट जाऊ शकते हॅकर्सच्या ताब्यात, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : हे सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे, त्यामुळे स्कॅमर्स देखील या प्लॅटफॉर्मवर विशेष लक्ष ठेवून असतात. धक्कादायक बाब म्हणजे WhatsApp हॅक करण्याच्या या प्रयत्नात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची आणि मित्रांची नावे लोकांना फसवण्यासाठी वापरली जातात. मित्र आणि कुटुंबाच्या नावाने कोड विचारून युजर्सना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. पाहा डिटेल्स वाचा: काय आहे 'व्हेरिफिकेशन कोड स्कॅम' 'व्हेरिफिकेशन कोड स्कॅम'मध्ये युजर्सना WhatsApp चा लॉगिन कोड मजकूर मेसेजमध्ये मिळतो. खरं तर, हा Two Factor Authentication कोड आहे, ज्याद्वारे युजर्स नोंदणीकृत व्हॉट्सअॅप खाते क्रमांकावर लॉग इन करू शकतात. पण, या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार जवळचे मित्र आणि नातेवाईकांना मेसेज पाठवून त्यांना तो व्हॉट्सअॅप लॉगिन कोड चुकून पाठवण्यात आला असल्याचे सांगतो. अशात, जर तुम्ही चुकून हा त्यांना कोड परत पाठवला तर तुमचे अकांऊट लगेच हॅक होऊ शकते. जर तुम्हाला असा मेसेज मिळाला तर अशा मेसेजला अजिबात उत्तर देऊ नका .तसेच, WhatsApp कोड कधीही कोणासोबत शेअर करू नका. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे WhatsApp इतर कोणत्याही मोबाइल क्रमांकावर व्हेरिफिकेशन कोड पाठवत नाही. व्हेरिफिकेशन कोड युजर्सच्याच फोनवर असतो. हे कसे टाळता येईल? जर काही कारणामुळे तुम्ही या जाळ्यात अडकलाच , तर त्यानंतरही तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट परत मिळवू शकता. यासाठी तुमच्या फोनवरून व्हॉट्सअॅपमध्ये साइन इन करावे लागेल आणि तुम्हाला एसएमएसद्वारे मिळणारा सहा अंकी कोड टाकून तुमचा नंबर सत्यापित करावा लागेल. एकदा सहा अंकी एसएमएस कोड प्रविष्ट केला की, अकांऊट वापरणारी व्यक्ती आपोआप लॉग आउट होईल. तुम्हाला येथे Two Step Verification कोड प्रदान करण्यास सांगितले जाऊ शकते. हा कोड माहित नसल्यास, तुमचे अकाउंट वापरणाऱ्या व्यक्तीने Two Step Verification एनेबल केले असू शकते. कोडशिवाय व्हॉट्सअॅपवर साइन इन करण्यासाठी मात्र तुम्हाला सात दिवस प्रतीक्षा करावी लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BFV8GK