Full Width(True/False)

ठरलं! Xiaomi 11 Lite 5G NE भारतात या दिवशी होणार लाँच, ६४ मेगापिक्सल कॅमेरासह हे फीचर्स मिळणार

नवी दिल्लीः शाओमीने १५ सप्टेंबर रोजी आपला नवीन लाँच केला आहे. आता हा फोन भारतात एन्ट्री करणार आहे. फोनची लाँचिंग इव्हेंट मध्ये शाओमीने सांगितले की 11 Lite 5G NE स्मार्टफोन भारतात २९ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीचा हा फोन ग्लोबल ५जी बँड्स आणि सर्वात स्लीम तसेच हलका स्मार्टफोन असणार आहे. शाओमीच्या ग्लोबल VP आणि मॅनेजिंग डायरेक्टर मनू कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या फोनच्या इंडिया लाँच संबंधी सांगितले आहे. शाओमी 11 लाइट 5G NE चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोन मध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले HDR10+ सपोर्ट आणि डॉल्बी व्हिजन सोबत येते. फोनचा डिस्प्ले पंच होल डिझाइनचा आहे. शाओमीचा हा फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर ऑफर करीत आहे. १ टीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट करणाऱ्या या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा टेलिमायक्रो कॅमेराचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये कंपनी एनएफसी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, ड्यूल स्पीकर सारखे ऑप्शन दिले आहेत. हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12.5 वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hFFL9I