Full Width(True/False)

Apple AirPods 3 च्या लाँचनंतर AirPods 2 ची किंमत झाली खूपच कमी, पाहा नवीन किंमत

नवी दिल्ली : अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनीने ने नुकतेच आपल्या लाँच इव्हेंटमध्ये नेक्स्ट जनरेशन ऑडिओ डिव्हाइस ला लाँच केले होते. याच्या लाँचिंगनंतर आता कंपनीच्या सेकेंड जनरेशन ची किंमत कमी झाली आहे. याची किंमत २ हजार रुपयांनी कमी झाली असून, नवीन किंमतीसह डिव्हाइसला अ‍ॅपल इंडिया स्टोरवर लिस्ट करण्यात आले आहे. याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. वाचा: Apple च्या अधिकृत वेबसाइटवर AirPods 2 केवळ १२,९९० रुपयात मिळत आहे. कंपनीने दोनवर्षांपूर्वी या एअरपॉड्सला १४,९९० रुपयात लाँच केले होते. या एअरपॉड्सला यूजर्सची मोठी पसंती मिळाली होती. आता कंपनीने नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. AirPods 2 चे स्पेसिफिकेशन्स Apple AirPods 2 मध्ये ड्यूल बीम फॉर्मिंग मायक्रोफोन, ड्यूल ऑप्टिकल सेंसर आणि स्पीच डिटेक्टर सेंसरसह अनेक सेंसर दिले दिले आहे. यात हेडफोन चिप देखील दिली आहे. याचे वजन केवळ चार ग्रॅम आहे. यामध्ये पॉवरफुल बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये तीन तास टॉकटाइम ऑफर करते. कंपनीने यात ब्लूटूथ ५.० दिले आहे. AirPods 3 चे फीचर्स कंपनीने AirPods 3 च्या डिझाइनमध्ये मोठा बदल केला आहे. यात प्रेशर कंट्रोल करण्यासाठी फोर्स सेंसर दिले आहे. यात सिरी वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट मिळतो. पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी आयपीएक्स४ रेटिंग मिळाले आहे. यात Adaptve EQ आणि Spatial Audio सारखे फीचर्स मिळतात. कंपनीचा दावा आहे की, ६ तास बॅटरी बॅकअप मिळेल. हे एअरपॉड्स फास्ट चार्जिंग केससह येतात. यात MagSafe सपोर्ट मिळेल. एअरपॉड्सची किंमत १८,५०० रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pr7kYO