Full Width(True/False)

जामीन मंजूर झाल्याचं ऐकताच बदलले होते आर्यनच्या चेहऱ्यावरील भाव, अशी होती पहिली प्रतिक्रिया

मुंबई- बॉलिवूड अभिनेता याचा मुलगा याला एनसीबीने अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी अटक केली होती. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही आर्यनला जामीन मंजूर होत नव्हता. आर्यनची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. आपल्या लाडक्या मुलाच्या काळजीने शाहरुखदेखील प्रचंड चिंतेत होता. गौरी आणि शाहरुख यांची रात्रीची झोप उडाली होती. मात्र आता आर्यनला जामीन मंजूर झाला. आणि तुरुंगात असलेल्या आर्यनपर्यंत देखील ही बातमी पोहोचवली गेली. त्यानंतरचे आर्यनच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. मुलाच्या काळजीत शाहरुख व्यवस्थित अन्नपाणी देखील घेत नव्हता. हेच हाल गौरीचे देखील होते. मात्र जामीन मिळाल्याचं ऐकताच वकिलांच्या ऑफिसमध्ये बसलेला शाहरुख आनंदाने रडू लागला होता. त्याला प्रचंड आनंद झाला होता. त्याचे अश्रू थांबत नव्हते. गौरीला देखील प्रचंड आनंद झाला होता. दुसरीकडे आर्यनचे हावभाव देखील पाहण्यासारखे होते. आर्यन इतर वेळेस एकलकोंड्याप्रमाणे बसून राहायचा. तो तुरुंगात फार कुणाशी बोलत नसे. मात्र जेव्हा तुरुंगातील कर्मचाऱ्याने त्याला जामीन मिळाल्याचं सांगितलं तेव्हा आर्यनचा चेहरा पटकन खुलला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. शांत बसून असणारा आर्यन तेव्हा आनंदित झाला होता. आता घरी जायला मिळणार ही भावना आर्यनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. आर्यनला गुरुवारी जामीन मंजूर झाला असला तरी शुक्रवारी त्याची तुरुंगातून सुटका केली जाणार आहे. शुक्रवारी सकाळी न्यायालयाची ऑर्डर तुरुंगातील मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आर्यनला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातील. त्यानंतरचं आर्यनची सुटका केली जाणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Gyib9r