Full Width(True/False)

अभिनेता सचित पाटीलचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; या मालिकेत साकारतोय महत्त्वाची भूमिका

मुंबई : अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात मालिकांमधून केलेली असते. त्यानंतर ते सिनेमा, नाटकाकडे वळतात. तिथे ते व्यग्र झाले की मग ते मालिकांमध्ये फारसे दिसत नाही. परंतु नाटक, सिनेमांमध्ये रमलेले काही मराठी कलाकारांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये श्रेयस तळपदे, प्रार्थना, बेहेरे, मुक्ता बर्वे, उमेश कामत यांचा समावेश आहे. त्यांच्या पाठोपाठ आणखी देखील छोट्या पडद्यावर मालिकेमधून पुनरागमन करत आहे. स्टार प्रवाहवर 'अबोली ' ही नवी मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे. या मालिकेत पाटील इन्सपेक्टर अंकुश ही महत्त्वाची अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितने याआधी ग्लॅमरस आणि रोमँटिक भूमिका केल्या आहेत. त्यामुळे मालिकेत तो एक वेगळ्याच अंदाजत दिसणार आहे. त्याचा हा नवीन अंदाज प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास सचितेने व्यक्त केला आहे. त्याच्या या मालिकेबद्दल आणि त्यातील व्यक्तिरेखेबद्दल त्याने सांगितले की, ' पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करायला मी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाह सारख्या वाहिनी सोबत काम करायला मिळत आहे, त्याचा आनंद आहे. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी सगळ्या मालिका आवर्जून पहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.’


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3msnyz9