Full Width(True/False)

अरविंद त्रिवेदी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी हार्टअटॅकने निधन

मुंबई- रामानंद सागर यांची सुप्रसिद्ध मालिका '' मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता यांचे निधन झाले. त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. ईटाइम्सने त्यांचा पुतण्या कौस्तुभ त्रिवेदीशी संपर्क साधला असता त्याने याची पुष्टी केली. कौस्तुभ म्हणाला, 'ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती, पण मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं. बुधवारी अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. अनेक वेळा पसरल्या होत्या मृत्यूच्या अफवा अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूच्या अफवा अनेक वेळा पसरल्या आहेत. २०१९ मध्ये अरविंद त्रिवेदींच्या मृत्यूची अफवा मे महिन्यात आगीसारखी पसरली होती. त्यानंतर त्यांचा पुतणा कौस्तुभ त्रिवेदी याने ट्विटरवर स्पष्टीकरण देत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं होतं. त्याच वेळी, गेल्या वर्षी पुन्हा एका त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तेव्हा 'रामायण' मध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरीने त्या अफवा फेटाळल्या होत्या. त्याच्यसोबत कुटुंबातील सदस्यांनीही अफवा पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये केले काम अरविंद त्रिवेदी, मूळचे मध्य प्रदेशचे, त्यांनी 'पराया धन' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी काही हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अनेक गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आणि आपली ओळख प्रस्थापित केली. अरविंद त्रिवेदी यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'रामायण' व्यतिरिक्त त्यांनी 'विक्रम और बेताल ' या टीव्ही शोमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. गुजराती चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि गुजरात सरकारने त्यांचा सन्मानही केला. राजकारणातही ठेवलेलं पाऊल अभिनयाव्यतिरिक्त अरविंद त्रिवेदी यांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलं होतं. १९९१ मध्ये त्यांनी गुजरातच्या साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mvyvOX